![]()
“उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकनाथ शिंदे दिसतात,” अशी बोचरी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली असून, शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणजे मोदी त्यांचे बॉस झाले का? मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती, तेव्हा पंतप्रधान तुमचे बॉस झाले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्याचा उपमुख्यमंत्री विकास कामांसाठी पंतप्रधानांना भेटू शकतो, हे स्पष्ट करतानाच, तुम्ही गद्दार म्हणत राहा, तुमचा पक्ष संपतोय आणि शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, असा सणसणीत टोलाही रामदास कदम यांनी ठाकरेंना लगावला आहे. रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आपण बाळासाहेबांचे सुपुत्र आहोत, याची जाणीव ठवावी. टीका करत बसा, आम्ही कामातून उत्तर देऊ. अधिवेशन काळात देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांची आपल्या पिल्लाने बुके घेऊन भेट घेतली होती, याची माहिती घ्या. मग फडणवीस व अन्य नेते तुमच्या पिल्लाचे बॉस झाले का? असा सवाल करत कदम यांनी आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचा दाखला दिला. पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे असतात, हे लक्षात ठेवा. उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदे यांच्याविषयी केवळ द्वेष आहे. तुम्ही गद्दार म्हणत रहा, तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढत आहेत, असे कदम यांनी म्हटले. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा उद्धव ठाकरे म्हणजे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’:त्यांना रुदाली शब्दप्रयोग चपखल बसतो, नरेश म्हस्केंची बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधारी पक्षांवर तसेच शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यानंतर आता शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा मीडियासमोर रडले आहेत. रुदाली हिंदी चित्रपट आपण पाहिला असेल, ज्या पद्धतीने काही लोक खास रडण्यासाठी असतात, त्या पद्धतीने त्यांचा रुदाली झाला असल्याची टीका म्हस्के यांनी केली आहे. इथे संपूर्ण बातमी वाचा
Source link
'उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी एकनाथ शिंदेच दिसतात!':शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणजे मोदी त्यांचे बॉस झाले का? रामदास कदम यांचा पलटवार
