Headlines

Zeenat Aman : ‘प्रेम आणि स्वतःला गमावणं यातील फरक समजला’, मजहर खानसोबतच्या लग्नानंतर झीनत अमान यांना झालेला त्रास, अभिनेत्रीनं मांडली व्यथा


Zeenat Aman On Marriage With Mazhar Khan : झीनत अमान यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.

zeenat aman marriage with mazhar khan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – झीनत अमान यांनी १९८५ मध्ये अभिनेता मजहर खान यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुलं आहेत. मजहर खान यांच्यासोबतच्या लग्नानंतर झीनत अमान यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. लग्नानंतर मजहर खान आपली फसवणूक करत असल्याचं झीनत अमान यांना समजलेलं. मात्र, त्यांनी घटस्फोट घेतला नाही. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत झीनत अमान यांनी त्यांच्या लग्नाबद्दल आणि बॉलिवूडमधील अफेअरबद्दल भाष्य केलं आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल काय म्हणाल्या झीनत अमान?

मुलाखतीदरम्यान झीनत अमान म्हणाल्या की, ‘मी खूप तरुण होते, त्यावेळेस मी काही निर्णय घेतले. त्या वयामध्ये मला जे योग्य वाटत होतं आणि जे मला हवं होतं, त्याआधारे मी निर्णय घेतले. त्यातील काही निर्णय योग्य ठरले, तर काही चुकीचे ठरले. वय हे तुम्हाला आयुष्याकडे पुन्हा मागे वळून बघण्याची संधी देतं. नेहमीच स्वतःला दोष देण्याची गरज नसते.’

Maharashtra TimesOmkar Karve On Producer : ‘इंडस्ट्रीला लागलेली किड, तो नुसत्या शिव्या घालत नाही तर लाथाबुक्क्यांनी मारतो’, मराठी अभिनेत्याचे निर्मात्यावर गंभीर आरोप
मजहर खान यांच्यासोबतच्या लग्नाबद्दल बोलताना झीनत अमान म्हणाल्या की, ‘जेव्हा मी मजहरशी लग्न केलं, तेव्हा मला आई होण्याची इच्छा होती. आपलं कुटुंब असावं आणि त्यासाठी मुलं असणं गरजेचं आहे, असं मला वाटायचं. त्यानुसार मी निर्णय घेतला. पण या नात्यानं मला प्रेम आणि स्वतःला गमावणं यामधील फरक शिकवला. या नात्यातून शेवटी मला समजलं की, स्वतःला उद्ध्वस्त करून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला वाचवू शकत नाही. मी त्याच्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मलाच स्वतःची मदत करावी लागेल, हे मला जाणवलं. तो माझ्या मुलांचा वडील आहे, त्यामुळे मला त्याच्याबद्दल काहीच अपमानास्पद बोलायचं नाही.’

Vandana Gupte Interview : हाताने रिक्षा उलटवली, मराठी मोहीम योग्यच, वंदना गुप्ते यांची बेधडक मुलाखत

‘नात्यामध्ये फक्त प्रेमच नाही, तर आदर असणंही महत्त्वाचं आहे. कधी कधी स्वतःसाठी आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी नात्यातून बाहेर पडणं हेसुद्धा स्वतःवर केलेलं प्रेम असतं. वैवाहिक नात्यामध्ये महिलांनाच परिस्थितीशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला जातो. समोरच्या व्यक्तीचं वागणं चांगलं समजायचं आणि स्वतःला होणारा त्रास मात्र किरकोळ समजायचा, असं शिकवलं जातं. आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला असतो. पण कधीकधी समोरच्याशी जुळवून घेताना आपण स्वतःलाच ओळखणं विसरून जातो.’ असंही झीनत अमान यांनी म्हटलं.

Maharashtra TimesVandana Gupte : ‘नाटकाच्या प्रयोगात फोन वाजला की अभिनेते थांबतात, मला त्यांचा राग येतो’; स्पष्टच बोलल्या अभिनेत्री वंदना गुप्ते
बॉलिवूड कलाकारांच्या अफेअरबद्दल बोलताना झीनत अमान म्हणाल्या की, ‘लग्नानंतर अफेअर ही फक्त बॉलिवूडची अडचण नाही, तर ही माणसाची कमजोरी आहे. वैयक्तिक नातं अनेकदा सार्वजनिक मनोरंजनाचा विषय बनतं, हीच आपल्या इंडस्ट्रीची कमजोरी आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या दुःखाला गॉसिपमध्ये बदलून काहीही फायदा होत नाही.’ ‘बिटवीन अस बाय अनामिका’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत झीनत अमान बोलत होत्या.