Headlines

Why Americans Never Receive Unwanted Gifts The Secret Is Going Viral | Useful Gift Ideas: तुम्हालाही कायम नको असलेलं गिफ्ट मिळतं? अमेरिकेतील ही ट्रिक वापरा; कधीच होणार नाही निराशा


Gift Giving Tips: अमेरिकेत कार्यक्रमांच्या आमंत्रणासोबतच अपेक्षित भेटवस्तूंची यादी दिली जाते. त्यामुळे पाहुणे त्याच यादीतील वस्तू भेट देतात आणि नको असलेलं गिफ्ट मिळण्याचा प्रश्नच राहत नाही. भारतीय महिलेनं अमेरिकन लोकांचं हे सिक्रेट सांगितलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

New Project (5)
भेटवस्तू देणं हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. एखादी छोटीशी वस्तू जरी भेट म्हणून दिली, तरी नात्यामध्ये गोडवा आणि आपुलकी निर्माण होते. पण भेटवस्तूच्या बाबतीत हा अनुभव जवळपास सर्वांनीच घेतला असेल की, अनेकदा अशी एखादी वस्तू भेट म्हणून मिळते, ज्याची आपल्याला काहीच गरज नसते. किंवा समोरच्याचा आदर राखण्यासाठी आपण ती भेट स्वीकारतो. पण अमेरिकेत अशा गोष्टी क्वचितच घडतात. किंबहुना, तिथल्या लोकांना नको असलेलं गिफ्ट मिळण्याची शक्यता फारच कमी असते. पण असं का घडतं? अशी कोणती ट्रिक अमेरिकन लोक वापरतात, ज्यामुळे त्यांना नेहमी त्यांच्या पसंतीचंच गिफ्ट मिळतं? या प्रश्नाचं उत्तर अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय महिलेने दिलं आहे. चला जाणून घेऊया अमेरिकन लोकांचं हे हिडन सिक्रेट.
(फोटो सौजन्य – sarika_in_america/Instagram,ROMAN ODINTSOV/pexels.com)

काय आहे सिक्रेट ट्रिक?

​ ​

हा व्हिडिओ sarika_in_america या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही महिला सांगते की, अमेरिकन समाजात एक वेगळी पद्धत आहे. जेव्हा तुम्ही वाढदिवस, लग्न, डोहाळे जेवण किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमाचं आमंत्रण देता, तेव्हा त्यासोबत भेटवस्तूंची एक यादीही दिली जाते. लोक आपल्या पसंतीच्या भेटवस्तूंची यादी तयार करून ती आमंत्रण पत्रिकेसोबत पाठवतात. त्यानंतर पाहुणेही त्या यादीतीलच एखादी वस्तू भेट म्हणून देतात. ही सोपी ट्रिक वापरल्यामुळे लोकांना नको असलेली भेटवस्तू मिळत नाही. किंबहुना, त्यांना नेहमीच उपयोगी गिफ्ट मिळतं.

काय म्हणाले नेटकरी?

​ ​

हा व्हिडिओ ७६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी ही ट्रिक खूपच जबरदस्त असल्याचं म्हटलं आहे. ही पद्धत वापरल्यामुळे लोक आनंदाने गिफ्ट स्वीकारतात, असा अनुभव अमेरिकेत राहणाऱ्या अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये शेअर केला आहे.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा