Gift Giving Tips: अमेरिकेत कार्यक्रमांच्या आमंत्रणासोबतच अपेक्षित भेटवस्तूंची यादी दिली जाते. त्यामुळे पाहुणे त्याच यादीतील वस्तू भेट देतात आणि नको असलेलं गिफ्ट मिळण्याचा प्रश्नच राहत नाही. भारतीय महिलेनं अमेरिकन लोकांचं हे सिक्रेट सांगितलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(फोटो सौजन्य – sarika_in_america/Instagram,ROMAN ODINTSOV/pexels.com)
काय आहे सिक्रेट ट्रिक?
हा व्हिडिओ sarika_in_america या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही महिला सांगते की, अमेरिकन समाजात एक वेगळी पद्धत आहे. जेव्हा तुम्ही वाढदिवस, लग्न, डोहाळे जेवण किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमाचं आमंत्रण देता, तेव्हा त्यासोबत भेटवस्तूंची एक यादीही दिली जाते. लोक आपल्या पसंतीच्या भेटवस्तूंची यादी तयार करून ती आमंत्रण पत्रिकेसोबत पाठवतात. त्यानंतर पाहुणेही त्या यादीतीलच एखादी वस्तू भेट म्हणून देतात. ही सोपी ट्रिक वापरल्यामुळे लोकांना नको असलेली भेटवस्तू मिळत नाही. किंबहुना, त्यांना नेहमीच उपयोगी गिफ्ट मिळतं.
काय म्हणाले नेटकरी?
हा व्हिडिओ ७६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी ही ट्रिक खूपच जबरदस्त असल्याचं म्हटलं आहे. ही पद्धत वापरल्यामुळे लोक आनंदाने गिफ्ट स्वीकारतात, असा अनुभव अमेरिकेत राहणाऱ्या अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये शेअर केला आहे.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

