Headlines

Vijay Anand : सुप्रसिद्ध दिग्दर्शकानं 19 वर्षांनी लहान भाचीसोबतच थाटला संसार; ओशोंच्या सांगण्यावरून पहिल्या पत्नीला सोडलं अन् उरकलं दुसरं लग्न


Vijay Anand : देव आनंद यांचे भाऊ विजय आनंद यांनी ओशोंच्या सांगण्यावरून भाचीसोबत लग्न केलं होतं.

Vijay Anand Marriage With Sushma;
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘गाईड’, ‘ज्वेल थीफ’ आणि ‘तिसरी मंझिल’ यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे विजय आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कामाचं आजही कौतुक केलं जातं. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली. १९७८ मध्ये विजय यांनी त्यांची भाची सुषमासोबत लग्न केलं. विजय यांच्या या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. विजय यांच्या कुटुंबीयांनी या निर्णयाला विरोध केला, परंतु विजय यांनी ओशोंचा सल्ला मानून लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

विजय आनंद यांचं २००४ मध्ये वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर, त्यांची पत्नी सुषमा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं. सुषमा विजय यांच्यापेक्षा १९ वर्षांनी लहान होत्या.

Maharashtra TimesVaibhav Mangle : ‘ज्या प्रकारे परप्रांतीय कोकणात व्यवसाय करतायत, त्यावरून कोकणवासियांना इतर भाषा शिकाव्या लागतील’, वैभव मांगलेंचं विधान

‘राम बलराम’च्या शुटिंगदरम्यान लग्न

सुषमा यांनी फिल्मफेअरला सांगितलं की, १९७८ मध्ये ‘राम बलराम’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान त्यांचं लग्न झालं. सुषमा म्हणाल्या, ‘आम्ही एकमेकांना इतके आवडायचो की आम्हाला लग्न करायचं होतं. त्याला माझा साधेपणा आवडायचा. मला त्याचा स्वभाव आवडायचा. तो क्वचितच रागावायचा. मला जास्त राग यायचा. मी जास्त खेळकर होते. मी त्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम गोष्टी करायचं. कधी तो मला समजावण्याचा प्रयत्न करायचा, तर कधी मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करायचे. अनेक मुली त्याच्या मागे असायच्या. पण मला कधीही इन्सिक्योर वाटलं नाही.’

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

विजय आनंद १९७० च्या दशकात ओशोंचे अनुयायी बनले. त्याच सुमारास, ओशोंनी विजय यांना सुषमासोबत लग्न करण्याचा सल्ला दिला. कुटुंबाचा या नात्याला विरोध होता. २०२२ मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वैभव आनंद म्हणाले होते की, ‘त्या काळात माझ्या वडिलांच्या आयुष्यात काही अडचणी होत्या. त्यांना माझ्या आईशी लग्न करायचं होतं. रजनीश यांनी त्यांना आईबरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं.’

Maharashtra TimesDev Anand : झीनत अमानच्या आकंठ प्रेमात बुडालेले देव आनंद, प्रपोज करण्यापूर्वी राज कपूर यांच्यामुळे मनाला लागली ठेच, काय घडलेलं?
विजय आनंद यांचे मोठे भाऊ, देव आनंद या नात्यामुळे अजिबात खूश नव्हते. अलीकडेच, देव आनंद यांचे मॅनेजर अशोक सिन्हा यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, देव या निर्णयामुळे खूप अस्वस्थ झाले होते. अशोक सिन्हा यांनी विवेक लालवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, त्यावेळी विजय ओशोंच्या प्रभावाखाली होते. अशोक सिन्हा म्हणाले, ‘त्यावेळी विजय ओशोंच्या प्रभावाखाली होता. त्यानं पहिलं लग्न लवलीन नावाच्या महिलेशी केलं. नंतर, ओशोंच्या सल्ल्यानुसार त्यानं तिलाही सोडलं.’

Maharashtra TimesShalmali Kholgade : वयाच्या ३१व्या वर्षी मुस्लीम मुलासोबत लग्न, आई-वडिलांचीही संमती; शाल्मली म्हणाली, ‘प्रॉब्लेम फक्त समाजाला’
दरम्यान, विजय आनंद यांची पहिली पत्नी लवलीन थडानी होती. ते दोघंही ओशोंच्या आश्रमात भेटले होते. लवलीन आधी पत्रकार होती आणि नंतर तिनं चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, काही वर्षांनंतर ते वेगळे झाले.