Headlines

vidarbha yavatmal district 22 farmers ended life in month jan ; महिनाभरात 22 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; यवतमाळ जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव, काय कारण?


म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात नववर्षातील पहिल्याच महिन्यात जानेवारीमध्ये २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर यांनी दिली. यात झरी-जामणी, बाभूळगाव, दिग्रस तालुक्यात प्रत्येकी तीन; घाटंजी, केळापूर, यवतमाळ तालुक्यात प्रत्येकी दोन तर आर्णी, महागाव, दारव्हा, उमरखेड, नेर, कळंब आणि राळेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याचा समावेश आहे.

पश्चिम विदर्भात ४५ टक्के क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात येते. याखालोखाल सोयाबीन ४० टक्के, तर उरलेल्या भागात डाळ, ज्वारीची लागवड केली जाते.

Maharashtra Timesउपकार दुधाचे आई, मातेच्या शोधासाठी नेदरलँडचा महापौर नागपुरात, चित्रपटाला शोभेल अशी खरीखुरी कहाणी
शेत खरडून गेल्याने उत्पन्नाची आशा सुरुवातीलाच मावळली होती. यातून तग धरलेल्या पिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला. हे सारे संकट सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांना शेतामालाच्या भावाने दगा दिला. हाती आलेल्या पिकांतून लागवड खर्चही निघणे कठीण होत असल्याने हारलेला शेतकरी आत्महत्या करीत आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहेत, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

मागील वर्षी; २०२५मध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ४४६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यात ३९६, अकोला ३८८, बुलढाणा ३४३, वर्धा २२४ तर वाशीम जिल्ह्यात २१२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये युवा शेतकरी, भाड्याने शेती करणारे शेतकरी यांच्या नावाने सात-बारा नाही म्हणून सरकार दरबारी या आत्महत्यांची नोंद नाही. मक्त्याने शेती करणाऱ्या शेतमजुरांची संख्या प्रत्येक खेड्यात ५० टक्के आहे. त्यांना सरकारी पीककर्ज तसेच सरकारची नुकसानभरपाई मिळत नाही. नापिकी झाली तरी शेतीचे भाडे देणे अटळ असल्याने सात-बारा नावावर नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, असेही तिवारी यांनी म्हटले आहे. सरकारने पतपुरवठा, बियाणे सुधार, पीक पद्धतीत बदल तसेच लागवड खर्च ५० टक्क्यांनी कमी करणे, हमीभावावर राज्याने बोनस देणे या उपाययोजना न केल्यास चालू वर्षात हे संकट अधिक गहिरे होणार असल्याची भीतीही तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
Maharashtra TimesPune Crime : तळेगावात आईवरून शिवी दिल्याचा राग, तरुणाचं नको ते धक्कादायक कृत्य, पुणे हादरलं
आत्महत्याग्रस्तांमध्ये यांचा समावेश…
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमध्ये घाटंजी तालुक्यातील ससाणी येथील विलास जुनघरे, घोटीचे प्रकाश कुसराम; केळापूर तालुक्यातील सुसरीचे धीरज सामृतवार, बुजरूकच शाहू राठोड खैगाव; झरी जामणी तालुक्यातील झिबलाचे सचिन मरस्कोल्हे, गणेशपूरचे श्रीधर वारस्कर, भेंडाळाचे मारोती तुरणकर; बाभूळगाव तालुक्यातील मालापूरचे गजानन हेमने, मुस्ताबादचे गोपाळ घोंगे, डेहणीचे किसन वासनिक; यवतमाळ तालुक्यातील झुलीचे महेंद्र लडके, लोणीचे सुनील चव्हाण; दिग्रस तालुक्यातील रुई तलाव येथील संदीप राठोड, माळ हिवराचे प्रकाश भुजाडे, रूई मोठीचे महादेव ढगे; आर्णी तालुक्यातील परसोडाचे प्रशांत गुढे, महागाव तालुक्यातील शिरपूरचे नितीन देशमुख, दारव्हा तालुक्यातील मांगकिन्हीचे महादेव लावरे, उमरखेड तालुक्यातील भाम्बखेडातील शरद देशमुख, नेर तालुक्यातील पिंपरी कलगाचे नितीन फुलझले, कळंब तालुक्यातील कोठाचे वैभव शिरभाते, कळंब तालुक्यातील कोठाचे वैभव शिरभाते, राळेगाव तालुक्यातील जागजईचे प्रवीण वागदे यांचा समावेश आहे. या २२ शेतकऱ्यांव्यतिरिक्त दहा भाड्याने शेती करणाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र नावावर सात-बारा नसल्याने सरकार दरबारी त्यांनी नोंद होऊ शकली नसल्याचेही तिवारी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कारणे काय ?
बँकांमार्फत केवळ ५० टक्के पीककर्ज वाटप.
सावकार आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत लूट.
लागवड खर्च दुप्पट होऊनही अपेक्षित उत्पन्न नाही.
संकटकाळात सरकारकडून तुटपुंज्या मदतीचे वाटप.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत