Headlines

Independence Day 2026 Marathi Wishes Viral Messages, Images, Quotes, Shayri; १५ ऑगस्टच्या देशभक्तीपर मराठी शुभेच्छा, मेसेज, संदेश, फोटो


Independence Day Wishes 15 August Shubhechcha Marathi : देश स्वातंत्र्य होणं.. यापेक्षा गौरवाची, आनंदाची, अभिमानाची गोष्ट काय असू शकते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि यंदा देश ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्यदिन हा केवळ ध्वजारोहण आणि उत्सवाचा दिवस नसून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा संकल्प करण्याचा दिवस आहे. अशा या खास दिवशी तुम्ही मित्रमंडळी, नातेवाईक आणि प्रियजनांना या खास शुभेच्छा व मेसेज पाठवू शकता आणि स्वातंत्र्य आणखी खास बनवू शकता.

independence day 2026 wishes
१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण! अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून आणि असंख्य बलिदानातून आपल्या देशाने स्वातंत्र्याची पहाट अनुभवली. आज त्या ऐतिहासिक दिवसाला ८० वर्षे पूर्ण होत आहेत. ही ८० वर्षे केवळ एका देशाच्या प्रवासाची नाहीत, तर संघर्षातून सामर्थ्याकडे, स्वावलंबनाकडून आत्मनिर्भरतेकडे आणि विकासाकडे वाटचाल करणाऱ्या भारताची कहाणी आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर देशाच्या प्रगतीत प्रत्येक नागरिकाचा सहभाग आणि जबाबदारीही आहे. आज भारत नव्या संधी, नवी स्वप्नं आणि नव्या संकल्पांसह विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रवासात आपल्या देशाविषयीचा अभिमान आणि देशासाठी काहीतरी करण्याची भावना अधिक दृढ होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यदिन हा म्हणूनच केवळ उत्सवाचा दिवस नाही, तर आपल्या स्वातंत्र्याची किंमत आणि त्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे. या विशेष दिवशी देशभक्तीची हीच भावना आपल्या शब्दांतून, विचारांतून आणि शुभेच्छांमधून व्यक्त करूया. आपल्या प्रियजनांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना त्यांच्यापर्यंत पोहोचवूया अभिमान, एकता आणि नव्या भारताचा संकल्प! या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या देशाला मनापासून सलाम करूया आणि आपल्या भारताच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प करूया!

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला

सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा

सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा
उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा,
स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आम्ही,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,
भारतीय आहोत आम्ही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो..!

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो..!

ज्यांनी आपल्या रक्ताने लिहिली स्वातंत्र्याची गाथा
त्यांच्या चरणी आज शुभदिनी ठेवितो माथा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतमाता की जय..!

भारतमाता की जय..!

विविधतेतील एकता ही आपली शान आहे.
म्हणूनच माझा प्राणप्रिय भारत देश महान आहे, जय हिंद!

वंदे मातरम्..!

वंदे मातरम्..!

देशाचा मान, देशाचा अभिमान,
तीन रंगांत रंगलेला तिरंगा, हीच आमच्या देशाची शान!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतमातेला सलाम..!

भारतमातेला सलाम..!

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चमकतोय आकाशात तिरंगा हमारा

चमकतोय आकाशात तिरंगा हमारा

जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा हमारा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख
तेव्हाच सुंदर होईल आपल्या देशाचे रुप
स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!

आपला तिरंगा आपली शान

आपला तिरंगा आपली शान

वाऱ्यामुळे नाही तर भारतीय सैनिकांच्या
श्वासामुळे फडकतोय आपला तिरंगा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शहिदांच्या हृदयातील जिवंत ज्वाला, अमर रहे तिरंगा हमारा

शहिदांच्या हृदयातील जिवंत ज्वाला, अमर रहे तिरंगा हमारा

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा
शहिदांच्या हृदयातील जिवंत ज्वाला
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य अबाधित आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्र-सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

चंद्र-सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्र-सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

पाऊस पडू दे देश भक्तीचा, दिवा पेटू दे न्यायाचा,
अभिमान राहू दे शूर वीरांच्या त्यागाचा,
मनात दरवळत राहू दे सुगंध देश प्रेमाचा…
८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

भारत माझा महान, तिरंगाच आमुची शान..!

भारत माझा महान, तिरंगाच आमुची शान..!

तिरंग्याच्या रंगात नवे स्वप्न रंगवू,
शौर्याच्या गाथा हृदयात बाळगू,
एकतेच्या गंधाने देश फुलवू,
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मनापासून देऊन

भारत माता की जय

भारत माता की जय

हिमालयाच्या शिखराइतकी उंच आपली ओळख,
गंगेच्या प्रवाहासारखी निर्मळ आपली देशभक्ती,
शूरांच्या रक्तातून मिळालं स्वातंत्र्य अनमोल,
भारत माता की जय, हेच आपले खरे बोल

तिरंगा आपला आभाळी उंच फडफडत राहो

तिरंगा आपला आभाळी उंच फडफडत राहो

स्वातंत्र्याचा सुगंध श्वासात दरवळो,
तिरंगा आपला आभाळी उंच फडफडो
एकतेच्या गीतात भारताचा गौरव गुंजत राहो,
देशप्रेम हृदयात रूजवून
एकमेकांना शुभेच्छा संदेश देऊन

स्वातंत्र्यदिन हसत गात साजरा करूया

स्वातंत्र्यदिन हसत गात साजरा करूया

वीरांच्या त्यागाची आठवण जपूया,
भविष्याच्या स्वप्नांना उजाळा देऊया,
एकतेच्या माळेत माणुसकी गुंफूया,
स्वातंत्र्यदिन हसत गात साजरा करूया
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

स्वातंत्र्यदिनाच्या लाख लाख शुभेच्छा

स्वातंत्र्यदिनाच्या लाख लाख शुभेच्छा

तलवारीच्या धारेवर लिहिलं स्वातंत्र्याचं गीत,
अखंड भारताबद्दल वाढवूनी प्रीत,
हातात हात घेऊन वाढवूया मैत्रीची रित,
स्वातंत्र्यदिनाच्या लाख लाख शुभेच्छा

सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा

सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा
उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा,
स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

भारत माता की जय, जय हिंद..!

भारत माता की जय, जय हिंद..!

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक,
तरी आम्ही सारे भारतीय एक,
८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रतीक्षा सुनील मोरे

लेखकाबद्दलप्रतीक्षा सुनील मोरे“लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत.

लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या वाचकांना समजेल अशा सहज सोप्प्या भाषेत पोहोचवण्यात त्यांचा खरा हातखंडा आहे. प्रतीक्षा यांच्याकडे असलेली गहन रिसर्च करण्याची क्षमता आणि वाचकांच्या आवडीचे विषय निवडण्याचे ज्ञान यामुळे त्या सातत्याने वाचकांपर्यंत परिपूर्ण गोष्टी पोहोचवण्यात यशस्वी ठरतात.

कामाव्यतिरिक्त प्रतीक्षा यांना स्वत:साठी लिहिण्याची, प्रवास करण्याची आणि वाचनाची खूप आवड आहे. लिखाणाबद्दल त्यांना जी आसक्ती आहे त्यामुळेच त्यांच्या हातून असे प्रभावशाली लेख लिहिले जातात जे वाचकांचे लक्ष तर वेधून घेतातच पण त्यांना नवनवीन विषयांची गोडी देखील लावतात. प्रवासाची आवड असल्याने त्या नेहमीच बाहेरील जगातील विविध संस्कृती आणि लाईफस्टाईल अनुभवत असतात आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात दिसून येते.”आणखी वाचा