Headlines

Vidarbha School Reopening: शाळा 30 जूनलाच! विदर्भाबाबत उच्च न्यायालयाने खडसावले; शिक्षण विभागाचा निर्णय रद्द


Vidarbha School Reopening: ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना तीन ते पाच किलोमीटर अंतर पायी पार करून शाळेत जावे लागते. अशा परिस्थितीत कडक उन्हाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा मांडण्यात आला. तसेच यापूर्वीचे आदेशही मांडले.

school reopen
विदर्भ शाळा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: विदर्भातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रद्द ठरविला. यासोबतच न्यायालयीन सुनावणी सुरू असताना शिक्षण संचालकांनी नऊ जून रोजी काढलेले २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचे पत्रही न्यायालयाने अवैध ठरवत रद्द केले. त्यामुळे आता २० एप्रिल २०२३च्या शासननिर्णयानुसार विदर्भातील शाळा ३० जूनपासूनच सुरू कराव्या लागणार आहेत, असे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मंगळवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने राज्य सरकारला, २००७मधील न्यायालयीन निर्णय अस्तित्वात असताना विदर्भातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा तोंडी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर राज्य सरकारने मंगळवार, ९ जून रोजी संध्याकाळी नवे परिपत्रक काढत ‘विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू व्हाव्यात,’ असे या परिपत्रक काढले. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारतर्फे बाजू मांडताना ॲड. दीपक ठाकरे यांनी हे नवे परिपत्रक सादर केले. यावर बुधवारी निकाल देताना न्यायालयाने शिक्षण संचालनालयाचे २८ मार्च रोजीचे परिपत्रक तसेच ९ जूनचे अशी दोन्ही परिपत्रके रद्द केली.

Maharashtra TimesCongress News: महाराष्ट्रातील ‘नॉट रीचेबल’ काँग्रेस उमेदवार थेट रुग्णालयातील बेडवर आढळला; चर्चांबाबत केला महत्त्वाचा खुलासा
याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडताना ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी न्यायालयासमोर, जून महिन्यात विदर्भातील तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याचे निदर्शनास आणले.

Maharashtra TimesNagpur News: पिकनिकचा आनंद घेतानाच काका-पुतण्यासह तिघं बुडाले, नातेवाईकांचा धाय मोकलून आक्रोश, जेवणाचं साहित्यही नदीकाठीच पडून
– तर यानंतर अवमान कारवाई करू

न्यायालयाने विदर्भातील तापमान, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि यापूर्वीचे न्यायालयीन आदेश लक्षात घेत २३ एप्रिल २०२३ रोजीचा शासननिर्णय अंतिम ठरविला. त्यानुसार शाळा ३० जून व त्या दिवशी सुटी असल्यास त्यानंतरच्या शासकीय कामकाजाच्या दिवशीच सुरू कराव्यात, असे स्पष्ट केले; तसेच आजवरच्या न्यायालयांच्या आदेशांकडे शिक्षण संचालकांकडून दुर्लक्ष झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि शासननिर्णय अस्तित्वात असताना शिक्षण संचालकांनी स्वतंत्र पत्र काढणे योग्य नसल्याचेही खंडपीठाने नमूद केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा