Vicks and Cotton Trick for Cockroaches Goes Viral But Does It Really Work | किचनमध्ये फिरतात झुरळं? करा हा सोपा उपाय, काही दिवसांत त्रासापासून मिळेल सुटका
Vicks and Cotton Trick for Cockroaches Goes Viral But Does It Really Work | किचनमध्ये फिरतात झुरळं? करा हा सोपा उपाय, काही दिवसांत त्रासापासून मिळेल सुटका
Kitchen Cleaning Tips: सोशल मीडियावर विक्स वापरून झुरळं पळवण्याचा एक घरगुती उपाय व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील अचंबित व्हाल.
ai generated images
झुरळ हा खरं तर वाघापेक्षाही जास्त त्रासदायक जीव आहे. होय, कारण एक वेळ वाघापासून तुम्ही वाचू शकता; पण एकदा का झुरळांनी घरात प्रवेश केला, की त्यांना हाकलणं खूप कठीण होतं. विशेषतः किचनमध्ये झुरळं दिसणं हे अस्वच्छतेचं लक्षण मानलं जातं. कारण झुरळं प्रामुख्याने गटार, नाले आणि कचरापेट्यांमध्ये फिरतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर डोळ्यांना न दिसणारे असंख्य जंतू आणि जीवाणू असू शकतात.
हेच जंतू अन्नात पोहोचून संसर्ग आणि विविध आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे झुरळांना किचनपासून दूर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पण ते कसं? अनेकदा झुरळांचा बंदोबस्त करणं इतकं कठीण वाटतं की, ‘यांना तर न्यूक्लिअर बॉम्बही काही करू शकत नाही,’ अशी गंमत म्हणून म्हटलं जातं. मग असा कोणता सोपा उपाय आहे, ज्यामुळे झुरळांना घरातून बाहेर घालवता येईल? चला, जाणून घेऊया एक अतिशय सोपा आणि जवळपास खर्च न करता करता येणारा घरगुती उपाय.
काय सांगितलं व्हिडीओमध्ये?
हा उपाय rupalikukretydiaries या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. चला तर मग, वायफळ चर्चा न करता थेट उपाय जाणून घेऊया.
या उपायासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी लागतील – विक्स बाम आणि कापूस.
कापसावर थोडंसं विक्स लावा आणि तो झुरळं फिरत असलेल्या ठिकाणी ठेवा. विशेषतः गॅसजवळ, स्वयंपाकघरातील कोपऱ्यांमध्ये आणि ज्या ठिकाणी झुरळं वावरतात, त्या सर्व ठिकाणी विक्स लावलेला कापूस ठेवा किंवा थेट त्या जागांवर विक्स लावा. काही दिवसांनी झुरळं आपोआप घर सोडून जातील, असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Erik Karits/pexels.com)
नेटकरी काय म्हणाले?
हा व्हिडीओ १ कोटी ३९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही ट्रिक वापरून पाहिल्याचा दावा केला असून, त्यांना सकारात्मक परिणाम दिसल्याचं म्हटलं आहे. तर काहींच्या मते, त्यांच्या घरात ही ट्रिक फारशी प्रभावी ठरली नाही. दरम्यान, काहींनी पालींना घरातून पळवण्यासाठीही अशाच प्रकारच्या उपायांची मागणी केल्याचं दिसून येत आहे.
टीप: या उपायाच्या परिणामकारकतेला वैज्ञानिक किंवा अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे हा केवळ सोशल मीडियावर व्हायरल झालेला घरगुती उपाय म्हणूनच पाहावा.
लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.
डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.… आणखी वाचा