Headlines

Delhi Woman Quits UPI Says Cash Helped Control Her Spending | ८०% कॅश, २०% UPI! खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी तरुणीनं शोधली भन्नाट युक्ती, आता भरपूर पैशांची होते बचत


Money Saving Tips: दिल्लीतील एका तरुणीने खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी बहुतांश व्यवहार रोख रकमेत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तिचं महिन्याचं बजेट नियंत्रणात आलं असून, बचतही चांगली होत असल्याचं ती सांगते.

Cash Payment
(फोटो सौजन्य – rockstarz.gf/Instagram)
आपल्यापैकी अनेक जण असे आहेत, ज्यांना पैशांची बचत करायची असते. पण खर्चावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि तिथेच सगळा घोळ होतो. त्यात आता डिजिटल पेमेंट व्यवस्था आल्याने ही समस्या आणखी वाढली आहे. आर्थिक व्यवहार इतक्या वेगाने होतात की पैसे खर्च होत आहेत, याची जाणीवच होत नाही. मात्र, या समस्येवर दिल्लीतील एका तरुणीने वेगळाच मार्ग शोधून काढला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून ती बहुतांश खरेदी रोख रकमेत करते. तिचे ८० टक्के व्यवहार रोख आणि २० टक्के डिजिटल पेमेंटद्वारे होतात. त्यामुळे सतत पैसे खर्च करण्याची तिची सवय बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे.

खर्चावर कसं मिळवलं नियंत्रण?

​ ​

हा व्हिडीओ rockstarz.gf या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या तरुणीने सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून ती बहुतांश व्यवहार रोख रकमेत करत असून UPI चा वापर जवळपास बंद केला आहे. त्यामुळे तिच्या खर्च करण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. UPI मुळे आर्थिक व्यवहार खूप सहज होतात; मात्र, पाकिटातील पैसे खर्च होत असल्याची जाणीव होत नाही. याउलट, जेव्हा तुम्ही रोख रक्कम खर्च करता, तेव्हा प्रत्येक वेळी पैसे हातातून जात असल्याची जाणीव होते. शिवाय, पाकिटात किती पैसे शिल्लक आहेत, हेही लगेच दिसते.

महिन्याचं बजेट आलं नियंत्रणात

​ ​

व्हिडीओच्या शेवटी ती सांगते की, रोख रकमेत व्यवहार करण्यास सुरुवात केल्यापासून तिचं मासिक बजेट नियंत्रणात आलं आहे. शिवाय, तिची बचतही वाढली आहे. आता ती ८० टक्के खरेदी रोख रकमेत करते, तर उर्वरित २० टक्के व्यवहार सुट्ट्या पैशांची अडचण आल्यास UPI द्वारे करते. हा व्हिडीओ १ लाख २० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून अनेकांनी तिच्या या युक्तीचं कौतुक केलं आहे. काहींनी आपणही ही पद्धत वापरून पाहणार असल्याचं म्हटलं आहे.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा