Headlines

Mumbai Sawantwadi Road Regular Express Approval to start Halt at 22 Stations; रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-सावंतवाडी नियमित एक्स्प्रेस सुरु, महत्त्वाची शहरे जोडली जाणार; कुठे-कुठे थांबा?


Mumbai Sawantwadi New Express Train : मुंबईहून कोकण अन् कोकणहून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सीएसएमटी ते सावंतवाडी रोड आता नियमित एक्स्प्रेस सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.

Mumbai Sawantwadi New Express Train
मुंबई सावंतवाडी रोड नियमित एक्स्प्रेस(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
महेश चेमटे, मुंबई : मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन एक्स्प्रेस सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ही नियमित स्वरूपात असणार आहे. सुमारे ५१० किलोमीटरच्या या मार्गामुळे मुंबई, ठाणे, पनवेलपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण कोकणातील महत्त्वाची शहरे थेट रेल्वेने जोडली जाणार आहेत.

गाडी दररोज धावणार

प्रस्तावित सेवेला १५०८७ सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि परतीच्या प्रवासासाठी १५०८८ सावंतवाडी रोड-सीएसएमटी एक्स्प्रेस असे क्रमांक देण्यात आले आहेत. ही गाडी दररोज धावणार असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना आणखी एक नियमित रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे. या एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, वालिवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे व्यावसायिक थांबे देण्यात येणार आहेत.

Maharashtra TimesTukaram Mundhe : सोयाबीन तेलापासून बनवायचे तूप अन् पनीर! अमोल डेअरीवर FDAची धाड; 3 लाखांहून अधिकचा साठा जप्त, अधिकारीही अचंबित

रेल्वे कनेक्टिव्हिटी करण्यासाठी प्रयत्न

मुंबई आणि कोकण यांच्यातील प्रवास अधिक सुलभ झाल्याने कोकणातील पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि निसर्ग पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांसह मुंबईत ये-जा करणाऱ्या कोकणवासीयांनाही या सेवेचा फायदा होणार आहे. महामुंबईसह दक्षिण कोकणातील महत्त्वाची स्थानके या सेवेमुळे थेट जोडली जाणार असल्याने प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. वाढती प्रवासी मागणी लक्षात घेता ही रोजची एक्स्प्रेस सेवा कोकणातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही.

Maharashtra TimesBlood Bank: रक्तपेढ्यांना आता FDAचा चाप! राज्य रक्तधोरणात सामान्यांना तक्रारीचा अधिकार; शिबिर आयोजकांवरही बंधने

मध्य रेल्वे

स्थानक – माटुंगा ते मुलुंड
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – स. ११.०५ ते दु. ३.४५
परिणाम – ब्लॉकवेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

Maharashtra TimesTanmay Wange : पुण्यातील MBBS चा विद्यार्थी 14 दिवसांपासून बेपत्ता, आई रुग्णालयात, हॉस्टेलवर रॅगिंग झाल्याचा आरोप

हार्बर रेल्वे

स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – स. ११.४० ते दु. ४.४०
परिणाम – सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल ते कुर्ला फलाट ८वरून २० मिनिटांच्या फरकाने विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा