Headlines

Vasantrao Naik महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक कसे झाले? Congress, Shivsena कशी वाढवली? – vasantrao naik get a new identity as the father of green revolution


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गोष्ट आहे 1 जुलै 1913 मधली. विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील गहुली गावात जन्मलेल्या एका बंजारा समाजातील हिऱ्याची… हे हे बाळ जन्माला आलं तेव्हा संपूर्ण कुटुंब भटकंतीचे जीवन जगायचं. आजच्याच दिवशी जन्म घेतलेला या हिऱ्यानं पुढे आपलं संपूर्ण जीवन कृषी आणि शेतकऱ्यांसाठी वाहून घेतलं. महाराष्ट्रला खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण बनवत सिंचन क्षेत्र,शेतीतज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेतीला चालना देत हरित क्रांतीचे जनक म्हणून नावलौकिक मिळवला. शेतकऱ्यांचे धान्य उगवण्यापासून, विकण्यापर्यंत आणि विकण्यापासून ते नफ्याची काळजी करणारा, निसर्ग, शेती, माती आणि माणूस यांची कळवळ्याची नाती जोपासणारा हा शेतकऱ्यांचा नेता कोण होता. बंजारा समाजातून आलेला मुलगा पुढे महाराष्ट्राचा सर्वात दीर्घकाळ मुख्यमंत्री कसा राहिला, ११ वर्षांच्या काळात शेतीसमृद्धीसाठी आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं किती महत्त्वाची कामं केली आणि पुसदचे नगराध्यक्ष ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला राजकीय पाठबळ देतवसंतसेना म्हणून कशी राजकीय कारकीर्द घडवली हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत