नवी दिल्ली18 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

पंतप्रधान मोदींनी रविवारी दुपारी इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला. पंतप्रधानांनी सांगितले की, 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर जाण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान निवासस्थानी प्राणी आणि पक्ष्यांना दाणे खाऊ घातले.
पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवर लिहिले, “दररोज सकाळी माझ्या मित्रांना खायला घालणे ही माझी रोजची दिनचर्या आहे.”
सर्वात आधी पाहा पंतप्रधानांचा VIDEO…
मोदींच्या इंस्टाग्रामवर मागील 2 व्हिडिओ…
6 ऑगस्ट: पंतप्रधानांनी हँडलूम डे पूर्वी व्हिडिओ पोस्ट केला

पंतप्रधान मोदी व्हिडिओमध्ये म्हणत आहेत- ‘मित्रांनो, 7 ऑगस्ट 1905 चा दिवस आपण विसरू नये. या दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती.
इंग्रजांविरुद्ध देशवासीयांनी खूप मोठा लढा दिला होता. लोक एकत्र आले होते. गेल्या आठवड्यात तुम्ही सर्वांनी फ्रेंडशिप डे साजरा केला.’
हँडलूम डे साजरा करण्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक गरीब विणकर कुटुंब, जे आपल्या हातांनी कपडे बनवतात. घरात मागावर काम करतात. त्यांच्या कामाला प्रोत्साहन देणे.’
9 ऑगस्ट: कॉमनवेल्थ पदक विजेत्यांसोबत पंतप्रधानांचा सेल्फी व्हिडिओ

पंतप्रधान मोदींनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना भेट दिली. पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत सेल्फी घेतली, जी त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रील म्हणून शेअर केली.
या रीलची खास गोष्ट अशी होती की, बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या हरियाणाच्या साक्षी चौधरीने या भेटीची माहिती दिली. साक्षी म्हणाली-
हॅलो फ्रेंड्स, साक्षी चौधरी आहे. आज आम्हा सर्व कॉमनवेल्थ गेम्स पदक विजेत्यांना आमच्या माननीय पंतप्रधान सरांनी बोलावले आहे आणि आम्हाला याचा खूप अभिमान वाटत आहे. त्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला.
यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की “जो खेळेल, तो फुलेल, नेहमी भारतासाठी जयजयकार करा.” त्यांनी खेळाडूंकडून भारत माता की जय च्या घोषणाही वदवून घेतल्या.
