Headlines

UP Election 2027: BJP’s Secret Survey 70 ठिकाणी पराभव होणार, बहुमताचाही प्रश्न, मतदार नाराज – bjp secret survey up 2027 election 70 seat loss yogi adityanath


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#UP2027 #UttarPradeshElections2027 #YogiAdityanath #UttarPradeshPolitics #AkhileshYadav #UPPoliticalNews2027 मध्ये उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधीच भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धडकी भरवणारा भाजपचा एक अत्यंत गोपनीय सर्व्हे समोर आला आहे. हा सर्व्हे सांगतोय की, 2027 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि आघाडीच्या जवळपास 70 जागा कमी होणार आहेत. त्यामुळं या अहवालानुसार तब्बल 35 टक्के विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं असून आता त्यांची तिकीटं कापली जाण्याचीही शक्यता आहे. हा सर्व्हे समोर येत असताना यात अनेक कारण देखील देण्यात आल्यानं भाजपमध्ये चांगलीच भीती पसरली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘मिशन 2027’ च्या फोकसदरम्यान या अहवालाने आमदारांमध्ये तणाव वाढवला आहे. कारण, सत्ताविरोधी लाट टाळण्यासाठी 35% आमदारांचे तिकीट कापण्याच्या एकाप्रकारे सूचनाच या सर्व्हेमध्ये करण्यात आल्यात. महत्त्वाचं म्हणजे यात पूर्वांचलमध्ये आमदारांविरुद्धची नाराजी सर्वाधिक आहे त्यामुळं इथे आपला पत्ता कट होऊ शकतो असाच इशारा देण्यात आला आहे. तेव्हा हिंदुत्ववादी सरकारचा अजेंडा घेऊन चालणाऱ्या, योगींच्या सरकारच्या जागा कमी होणार हे सांगणारा भाजपनंच केलेला सर्व्हे कोणता आहे, त्यात भाजप आणि सत्ताधारी आघाडी पक्षाला काय इशारा देण्यात आलाय, मतदार संघातील आमदारांच्या कामगिरीवर बोट ठेवताना नाराजीची कोणती कारणं देण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात विधानसभेच्या 403 जागा असताना भाजपला ही निवडणूक सत्तेत बसवणार की मतदार गेम करून अखिलेश यादव यांना मतदार राजा बनवणार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#UP2027 #UttarPradeshElections2027 #BJPSecretSurvey #BJPInternalSurvey #YogiAdityanath #BJP70SeatLoss #BJPMLAs #AntiIncumbency #UttarPradeshPolitics #AkhileshYadav #SamajwadiParty #BJPMission2027 #UPPoliticalNews #PurvanchalPolitics #UttarPradeshNews #IndiaPolitics #BJPElectionStrategy #YogiGovernment #UPAssemblyPolls #BJPSurveyReport #Election2027 #PoliticalNewsIndia #HindiBeltPolitics #BJPvsSPAhead of the 2027 Uttar Pradesh Assembly elections, a confidential BJP survey has reportedly raised serious concerns for the party and Chief Minister Yogi Adityanath. The survey suggests the ruling alliance could lose around 70 seats and flags dissatisfaction with nearly 35% of sitting BJP MLAs, recommending that many may be denied tickets to counter anti-incumbency. Discontent is said to be highest in the Purvanchal region. As BJP prepares for its “Mission 2027,” the report has intensified anxiety within the party, raising a key question: will the BJP retain power, or will voters pave the way for Akhilesh Yadav in 2027?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत