EPFO चे नवीन पोर्टल विसरभोळ्यांसाठी पर्वणी कशी?
नोकरीच्या जागा बदलत राहण्याचा वाढता ट्रेंड आपला नेहमीच फायदा करवून देईल असे नाही. कधीकधी नोकऱ्यांच्या सतत बदलामुळे आधीच्या कंपनीच्या PF बद्दलची माहिती डोक्यातून निघून जाणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा एखादा कर्मचारी त्या PF बद्दल पूर्णपणेच विसरून जातो त्यावेळी खरी समस्या उदभवते. कारण आपण फक्त PF विसरत नाही तर आपण स्वतःच आपले आर्थिक नुकसान करवून घेतो. सामान्य कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून EPFO ने नवीन पोर्टल सुरु केली आहे.
एकंदरीत, जे कर्मचारी सततच्या नोकरीतील बदलामुळे आधीच्या PF संदर्भातली माहिती विसरले आहेत किंवा काही जुनी PF खाती निष्क्रिय झाली आहेत, अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या जुन्या PF खात्याची रक्कम आताही मिळवता येऊ शकते. जर एखाद्या कर्मचाऱ्याकडे एकापेक्षा जास्त UAN आहेत किंवा जुनी खाती सध्याच्या UAN शी जोडली नाहीयेत, अशा परिस्थितही कर्मचाऱ्याने घाबरण्याचे मुळीच कारण नाही कारण या समस्येचे समाधानही EPFO ने त्यांच्या नवीन पोर्टलवर दिले आहे.
EPFO ने नवीन आधार बेस्ड इ-पोर्टल सुरु केले आहे. एकंदरीत, कर्मचाऱ्याचे आधार ( Aadhar Number ) द्वारे त्याची पडताळणी होईल आणि त्यामाध्यमातून त्याला जुनी किंवा निष्क्रिय झालेले PF खाते शोधणे, जुन्या PF ची रक्कम काढून घेणे किंवा सेटल करणे तसेच जून PF आताच्या UAN शी जोडून घेणे अधिक सोपे होऊन जाईल. अगदी 2014 अगोदरची खातीही या पोर्टलच्या साहाय्याने शोधता येऊ शकतात आणि ती PF रक्कम आपल्या बँक खात्यात मिळवता येऊ शकतात.
Society Maintenance Charges Rules: जिम, स्विमिंग पूल वा क्लब हाऊस वापरत नाही, तरी सोसायटीचा मेंटेनन्स द्यायचा का? फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही तुमचा जुना UAN विसरला आहात किंवा जुना मेंबर आयडी लक्षात नाहीये तर जुन्या कंपनीशी किंवा त्या कंपनीच्या HR शी संपर्क साधा आणि ती माहिती मिळवून घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2014 च्या अगोदर UAN दिला जात नव्हता त्यामुळे घाबरून जाऊ नका. EPFO मेंबर पोर्टलवर जाऊन UAN Allotment for Existing PF Account या पर्यायाच्या माध्यमातून नवीन UAN तयार करा.
जर ती कंपनीच बंद झाली असेल तर तुमच्या शहरातील EPFO Office मध्ये जा. त्या कंपनीसंबंधित तुमचे काही महत्वाचे दस्तऐवज सोबत ठेवा. तुमच्या जुन्या PF खात्याच्या शोधामध्ये तुम्हाला पूर्ण सहायता मिळेल. या प्रक्रियेत आपल्याकडे मुख्यतः आधार कार्ड तसेच PAN Card आणि सक्रिय बँक खात्याचा तपशील असणे बंधनकारक आहे.

