Uddhav Thackeray led Shiv Sena UBT gets big shock after Yavatmal Leaders join Eknath Shinde Shiv Sena; शाहांच्या भेटीनंतर दिल्लीहून परतताच शिंदेंचा ठाकरेंना मोठा दणका, रात्री साडेअकरा वाजता भव्य पक्षप्रवेश
Uddhav Thackeray led Shiv Sena UBT gets big shock after Yavatmal Leaders join Eknath Shinde Shiv Sena; शाहांच्या भेटीनंतर दिल्लीहून परतताच शिंदेंचा ठाकरेंना मोठा दणका, रात्री साडेअकरा वाजता भव्य पक्षप्रवेश
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याहून परत आल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता ठाकरे गट आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करुन घेतला
एकनाथ शिंदे-अमित शाह-उद्धव ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
यवतमाळ/ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याहून परत येताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाला मोठा दणका दिला आहे. यवतमाळ येथील ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती धरला. विशेष म्हणजे रात्री साडेअकरा वाजता हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी शिंदेंच्या भेटीगाठी झाल्या. गुरुवारी संध्याकाळी ते दिल्लीहून परत आले. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता यवतमाळ येथील ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
“हे सर्व जण आधीपासून येऊन इथे थांबले होते, त्यामुळे रात्री साडेअकरा वाजता हा प्रवेश झाला आहे. मात्र हे या सगळ्यांनी दाखवलेलं प्रेम आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ येथील पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. Uddhav Thackeray : मिशन मनपा : महापालिकेच्या तोंडावर राज ‘मातोश्री’वर, युती निश्चित; उपराजधानीत ठाकरेंच्या शिवसेनेसमोर तीन आव्हानं कोणती? विधानसभा निवडणुकीत महायुतीला 232 जागांचं बहुमत मिळालं. लाडक्या बहिणींनी ही भरभरुन मदत केली. ही नांदी आहे. महायुतीवर लोक विश्वास दाखवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे या पुढील काळात विरोधकांमध्ये कोणी शिल्लक राहील किंवा नाही याबद्दल मला शंका आहे, अशी शालजोडीतील प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
शिवसेनेत 2022 मध्ये उभी फूट पडल्यानंतर, फुटीर आमदारांना उद्देशून ‘50 खोके, एकदम ओके’ अशी घोषणा देत एकनाथ शिंदे यांच्या तत्कालीन गटाला खिजवणारे जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. Maharashtra Politics : उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर जाणार? पुढील भेटीचा मुहूर्त ठरला, आदित्य-अमितही एकत्र येणार ‘भाजप प्रवेश करताना आपण कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही. केंद्र आणि राज्यातील निर्णायक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. जालन्याच्या पहिल्या महापालिका निवडणुकीत पहिला महापौर भाजपचा होणार. पक्ष देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन’ असे गोरंट्याल यांनी यावेळी सांगितले. दोन दिवसांपूर्वी परभणीचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती धरला होता.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा