two people injured in brutal beating by villagers on suspicion of child abduction in yavatmal ; बळजबरीने पळविले मात्र, मुलांना नव्हे! चौकशीनंतर कामठवाडातील घटनेचं बिंग फुटले
two people injured in brutal beating by villagers on suspicion of child abduction in yavatmal ; बळजबरीने पळविले मात्र, मुलांना नव्हे! चौकशीनंतर कामठवाडातील घटनेचं बिंग फुटले
Yavatmal Crime: मुले पळविण्याच्या संशयातून गावकऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यातील कामठवाडा येथे रविवारी सकाळी समोर आली आहे.
यवतमाळ क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: घाटंजी तालुक्यातील कामठवाडा गावात रविवारी सकाळच्या सुमारास काही गावकऱ्यांना एक कार संशयास्पद अवस्थेत दिसली. सात-आठ जण एकाला कापड झाकून घेऊन जात होते. गावकरी जवळ जाऊ लागताच चालकाने कार पळविली. हे लोक मुले पळविणारे असल्याचा समज झाल्याने गावकऱ्यांनी कारचा पाठलाग केला. पांढुर्णा खुर्द गावाजवळ कार उलटली. गावकऱ्यांनी कारमधील लोकांना चोप दिला. नंतर विचारपूस केली असता आर्थिक वादातून त्यांनी उत्तर प्रदेशातील संजय सोनकर (५०) यांना मुकुटबनमधून पळवून आणल्याचे स्पष्ट झाले.
कामठवाडात रविवारी सकाळच्या सुमारास गावकऱ्यांना एक संशयास्पद कार दिली. गावकऱ्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न करताच चालकाने कार भरधाव पुढे नेली. काही क्षणात ही माहिती गावात पसरली. गावकऱ्यांनी तातडीने शेजारच्या गावांशी संपर्क साधत मुलांना घेऊन जाणारी टोळी येत असल्याची माहिती देऊन कारचा पाठलाग सुरू केला. याच सुमारास कारचे समोरील दोन्ही टायर फुटले; तरीही चालकाने वाहन लोखंडी चाकांवरच रस्त्यावरून पळविले. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या ग्रामस्थांचा संशय अधिकच वाढत गेला. पांढुर्णा खुर्द गावाजवळ कार उलटली.
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा