Headlines

20 yrs old young man killed two elderly people in arvi wardha district but toddler survived ; वर्ध्यात भररस्त्यावर थरार! 20 वर्षीय तरुणाने दोन वृद्धांना निर्घृणपणे संपवलं; चिमुकली थोडक्यात बचावली


Wardha Crime: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे माथेफिरु तरुणाने दोन वृद्धांना निर्घृणपणे संपवलं. या हल्ल्यात एक चिमुकली थोडक्यात बचावली. नेमकं काय घडलं?

crime
crime(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे एका माथेफिरू तरुणाने बुधवारी रस्त्यावरील नागरिकांवर एका मागोमाग एक हल्ले केले. यात दोन वृद्धांचा मृत्यू झाला. तर एक चिमुकली बचावली. आर्वी येथील इंदिरा चौक परिसरात दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. मयुरेश गजानन लाडके उर्फ मत्या (वय २०) असे माथेफिरू तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?
मत्या हा आर्वीतील नेताजी वॉर्ड परिसरात कुटुंबीयांसोबत राहतो. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी घरी कोणी नसताना त्याने स्वत:च्या आजीवर हल्ला केला. परंतु, शेजारी वेळीच धावून आल्याने आजीचा जीव वाचला. त्यानंतर हातात लाकडी दंडुका घेऊन तो दुपारी नग्नावस्थेत घराबाहेर पडला. रस्त्यावर दिसेल त्याला दांड्याने मारण्यासाठी तो नागरिकांच्या मागे धावायला लागला.

Maharashtra TimesLadki Bahin Yojana: ‘लाडकी’चे पैसे काढणासाठी पतीचा अजब जुगाड; बँकेत पत्नीच्या जागी दुसरीलाच केले उभं अन्…
नेताजी वॉर्डमध्ये खेळत असलेल्या एका आठ वर्षांच्या मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न मत्याने केला. मात्र, तिने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावले आणि तिची सुटका केली. त्याचा त्रास वाढत असल्याचे पाहून काही जणांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना हुलकावणी देऊन तो दुसरीकडे पळून गेला. त्याने इंदिरा चौक येथे रस्त्यालगत बसलेल्या रामकृष्ण श्रावण राऊत (रा. हनुमाननगर, आर्वी) यांना दांड्याने मारहाण केली. त्यात राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. राऊत यांना मारल्यानंतर मत्याने इंदिरा चौक येथे शेतमाल विक्रीसाठी आलेल्या ८५ वर्षीय रामराव महादेव वांगे यांच्यावरही हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. वांगे यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

Maharashtra TimesBuldhana News: मेंदूचा आजार, अचानक बेशुद्ध पडली, रात्रभर रुग्णालयात पण… सेजलच्या मृत्यूने आईचा टाहो, बुलढाणा हळहळलं
मत्याचा त्रास वाढल्यानंतर काही नागरिकांनी हिंमत करून त्याला पकडले आणि चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी मत्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा