Tourists banned at major waterfalls and forts in pune district restrictions effective until august 31; पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांसह प्रसिद्ध धबधब्यांवर पर्यटकांना बंदी
Tourists banned at major waterfalls and forts in pune district restrictions effective until august 31; पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांसह प्रसिद्ध धबधब्यांवर पर्यटकांना बंदी
पुणे : पुणे जिल्ह्यात जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने घातलेल्या थैमानामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वाढती गर्दी, संभाव्य अपघात, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगड-विसापूर किल्ले, भाजे धबधबा यासह तुंग-तिकोना गडांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ही बंदी राहील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
एकीकडे गड-किल्ल्यांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली असताना पुणे जिल्ह्यातील अनेक प्रसिद्ध धबधब्यांवर जाण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार लोणावळा परिसरातील टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, एकवीरा देवी कार्ला लेणी, तसेच पवना धरण परिसर या प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर!
अतिवृष्टीमुळे ठप्प झालेली मुंबई-पुणे रेल्वेची घाटमार्गावरील वाहतूक आता अंशत: सुरू झाली आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून दुसरी मार्गिका बुधवारी रात्री उशिरा सुरू करण्याचे नियोजन आहे. तिसरी मार्गिका सुरू करण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
कर्जत ते लोणावळा घाटात दोन ठिकाणी दरड कोसळल्याने रविवारी मध्यरात्रीनंतर बंद झालेली रेल्वे वाहतूक तब्बल ४४ तासांनंतर अंशतः सुरू झाली आहे. मध्य रेल्वेने मंगळवारी रात्री १०.२० वाजता घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली. उर्वरित दोन मार्गिकांवरील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घाटात २७ किमीची एक अशा एकूण तीन मार्गिका असून त्यांची एकूण लांबी ८१ किमी आहे. यातील ठाकूरवाडी ते खंडाळादरम्यान १२ किलोमीटर परिसरातील रेल्वेरुळ दरडींमुळे बाधित झाला आहे. रुळांना आधार देणारी जमीन खचली. यामुळे जमिनीत सुमारे ४० ते ४५ मीटर भराव टाकण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे, खडकात ‘रॉक बोल्डिंग’द्वारे जाळी बसवणे आणि गॅबियन वॉलची उभारणी करण्यात येत आहे. यातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याचा वापर भराव टाकण्यासाठी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत मध्य रेल्वेने १,१००हून अधिक कामगार घटनास्थळी तैनात केले आहेत. दुरुस्तीसाठी बोल्डर स्पेशल ट्रेन, बॅलास्ट रेक, युनिमॅट आणि ड्युओमॅटिक मशिन, पोकलेन, जेसीबी यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. दोन मार्गिकांवरून अप आणि डाउन मेल-एक्स्प्रेसची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तिसरी मार्गिकाही सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
घाट विभागातील काम पूर्ण होईपर्यंत काही गाड्या विलंबाने धावण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइन आणि एनटीईएस ॲपवरून गाड्यांची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. घाट मार्ग सुरू झाल्यानंतर गाडी क्रमांक ११०१३ लोकमान्य टिळक टर्मिनस-कोयंबतूर एक्स्प्रेस मंगळवारी मध्यरात्री १२.४५ वाजता ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादेसह रवाना करण्यात आली. त्यानंतर ११०४१ दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, तर अप मार्गावर १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी हुसेनसागर एक्स्प्रेस पहाटे ५.०९ वाजता रवाना करण्यात आली. दरम्यान, आज, गुरुवारी सीएसएमटी ते पुणे ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या डेक्कन, डेक्कन क्वीन, इंटरसिटी आणि साई नगर शिर्डी ते दादर या गाड्या रद्द राहणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा