Headlines

Moshi Building Collapse: मोशीत मोठी दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; 7 जणांची सुटका, 11 कामगार अजूनही ढिगाऱ्याखालीच – garbage mound collapses onto building in moshi 7 rescued 11 workers still trapped under debris


Building Collapse In Moshi Pimpri Chichwad: पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कचरा मोशी कचरा डेपो येथे टाकला जातो. गेली अनेक दशके हा कचरा येथे टाकला जात असल्याने येथे शेकडो एकर जागेवर कचऱ्याचे मोठमोठे डोंगर निर्माण झाले आहेत.

moshi building collapse
मोशी कचरा डेपो दुर्घटना(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा डोंगर डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या कार्यालयावर कोसळला. हजारो टन कचरा इमारतीवर कोसळल्याने तीन मजली इमारत कोसळून त्यात १८ कामगार अडकले. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ ), भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करीत एक महिला आणि सहा पुरुष अशा सात कामगारांना सुरक्षित बाहेर काढले. उर्वरित ११ कामगारांना बाहेर काढण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू होते.

या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरच वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविणाऱ्या अँटनी लॉरा या कंपनीने तीन मजली इमारत उभारली आहे. चार महिन्यांपूर्वीच या इमारतीचे उद्घाटन झाल्याचे येथील कामगारांनी सांगितले. गेले तीन ते चार दिवस सातत्याने पाऊस येत असल्याने या इमारतीवर कचऱ्याचा एक डोंगर कोसळला. हजारो टन कचरा इमारतीवर आल्याने इमारत क्षणात कोसळली.

Maharashtra TimesPune Crime : पुरोगामी महाराष्ट्रात 6 पोलिसांचं शरमेनं मान खाली घालणारं कृत्य, 5 पोलीस जेरबंद
इमारती कोसळली तेव्हा इमारतीत सुमारे २३ कामगार असल्याचे सांगण्यात आले. त्यातील पाच कामगार या ढिगातून स्वतःहून पळत बाहेर पडले. मात्र, इतर कामगारांना बाहेर पडता आले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. ‘एनडीआरएफ’ आल्यानंतर त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. मात्र, दोन तासानंतरही अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले नाही. त्यामुळे भारतीय सैन्याला बोलाविण्यात आले. ‘एनडीआरएफ’ आणि सैन्य दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या सहा कामगारांना बाहेर काढले.

कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली किती कामगार आहेत, कसे आहेत, हे जाणून घेण्यासाठी ‘एनडीआरएफ’ने ढिगाऱ्यात माइक सोडला होता. या माइकमध्ये अडकलेल्या नागरिकांचा आवाज ऐकू आला. त्यानंतर या नागरिकांना श्वास घेता यावा, ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये, यातही ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला.

Maharashtra TimesPune Building Collapsed : पुण्यात मोठी दुर्घटना, पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळली; 14 जण अडकल्याची भीती
मोशी कचरा डेपो येथे इमारत कोसळून दुर्घटना घडल्याचे कळताच शहरातील एका आमदाराने त्याचे छायाचित्रकार, ड्रोन उडवणारे लोक, पालिकेतील कामे सांभाळणारे लोक घटनास्थळी पाठवले. पोलिस, आपत्ती निवारण पथकांचे काम सुरू असताना संबंधितांची घटनास्थळी लुडबुड सुरू होती.

‘सातत्याने पाऊस सुरू असल्याने मोशीतील कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर ढासळला. त्यामुळे एक तीन मजली इमारत कोसळली. या इमारतीत एकूण २३ कामगार होते. त्यातील पाच कामगार वरच्या मजल्यावर असल्याने उड्या घेऊन बचावले. मात्र, ११ कामगार कचरा आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. त्यातील सात कामगारांना ‘एनडीआरएफ’ आणि आर्मी जवानांनी सुखरूप बाहेर काढले. उर्वरित १२ जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातील तीन जणांशी संपर्क झाला आहे. मात्र, त्यांच्या पायावर वजन पडल्याने त्यांना बाहेर काढता येत नाही. त्यांना बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. वेळ लागला, तरी चालेल; पण सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न होईल,’ असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Maharashtra TimesMumbai Pune Railway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे मार्गावर अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे धावली, ४ गाड्या सुटल्या!
घटनाक्रम...
-तीन मजली इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला
-इमारतीत २३ कामगार; पाच कामगारांनी उड्या घेऊन जीव वाचवला. मात्र, १८ कामगार अडकले
-पोलिस आणि अग्निशमन दलाकडून तातडीने मदत ‘एनडीआरएफ’, लष्कराला पाचारण
-जवानांनी भिंत फोडून, जेसीबीच्या सहाय्याने कचरा बाजूला करीत सहा कामगारांना बाहेर काढले
-अद्यापही ११ कामगारांना काढण्याचे काम सुरू

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा