Three students dead due to snake bite in a residential school in gadchiroli one student in serious condition airlifted to nagpur; सर्पदंशामुळे चौथ्या विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर, हेलिकॉप्टरने नागपुरात वैद्यकीय स्थलांतर
Three students dead due to snake bite in a residential school in gadchiroli one student in serious condition airlifted to nagpur; सर्पदंशामुळे चौथ्या विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर, हेलिकॉप्टरने नागपुरात वैद्यकीय स्थलांतर
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आश्रमशाळेतील एकूण सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्यानंतर त्यापैकी तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, उपचार घेत असलेल्या तीन विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला गडचिरोलीहून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपुरात वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले आहे. गडचिरोली पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून हे वैद्यकीय स्थलांतर करण्यात आले.
धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी जेवणानंतर झोपल्या असताना रात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याचे समोर आले. सर्पदंशानंतर विद्यार्थिनींची प्रकृती बिघडू लागल्याने त्यांना तातडीने धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असलेल्या विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना इयत्ता सहावीतील दीपिका लकडा, इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल आणि इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी या तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे आश्रमशाळेसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सर्पदंश झालेल्या इतर तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. यामध्ये इयत्ता पाचवीतील दीपिका मदवी, इयत्ता सहावीतील कविता किरंगा आणि इयत्ता आठवीतील समृद्धी सुरेश नैताम यांचा समावेश आहे. यापैकी समृद्धी नैताम हिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने अधिक सक्षम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलीस दलाने समन्वय साधत हेलिकॉप्टरच्या माध्यमातून समृद्धी नैताम हिचे नागपूर येथे वैद्यकीय स्थलांतर केले.
विद्यार्थिनीच्या उपचारात कोणताही विलंब होऊ नये, तसेच तिला आवश्यक वैद्यकीय सुविधा तातडीने मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला आहे. या घटनेनंतर आश्रमशाळेतील इतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले असून, सर्पदंशाची घटना नेमकी कशी घडली, याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा