Headlines

तिवस्यात हेल्मेट न वापरल्यास दंड:दोन ठिकाणी चेक पोस्टद्वारे वाहतूक नियमांवर कारवाई




तिवसा येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. विना हेल्मेट, ट्रिपल सीट, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात हायवेवरील पंचवटी चौक आणि कोर्ट परिसरात चेक पोस्ट लावून ही मोहीम राबवली जात आहे. दररोज सुमारे शंभर वाहनधारकांवर कारवाई केली जात असून, यामुळे वाहतूक नियमांबाबत जनजागृती होत असल्याचे पोलीस विभागाने म्हटले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. यात अमरावतीची जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखा, हायवे पोलीस आणि तिवसा पोलीस या तिन्ही यंत्रणा सहभागी आहेत. मोहिमेसाठी तिन्ही विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची आळीपाळीने नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी संयुक्त मोहीम राबवली जात आहे. याच अनुषंगाने तिवसा शहरातही दोन ठिकाणी ही धडक मोहीम सुरू आहे. दुचाकी चालकांना हेल्मेट वापरण्याबाबत समजावून सांगण्यात येत असून, अनेकांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. ही मोहीम दररोज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असते. यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसत असून, वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृतीही केली जात आहे. सोमवार, १० ऑगस्ट रोजी जिल्हा वाहतूक शाखेकडून सुशांत महल्ले, निखिल तलमले, बडनेरा हायवे पोलिसांकडून रवींद्र इंगळे, सुनील तिडके, अविनाश आठवले, तर तिवसा पोलीस स्टेशनकडून वाहतूक शिपाई सागर डोंगरे, शरद खेडकर आणि होमगार्ड वैशाली घुडजी यांनी कारवाईत सहभाग घेतला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत