Eknath Shinde On Mhada House: म्हाडा घरांच्या किमती २०२०-२१च्या रेडी रेकनर दरानुसार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले आहेत.

म्हाडाने विकसित केलेल्या चितळसर – मानपाडा येथील गृहप्रकल्पातील १,१७३ प्राप्त घरांपैकी ९३८ घरांची सोडत १४ जुलै, २०२५ रोजी काढली. या सोडतीमध्ये २०२५-२६च्या रेडी रेकनर दराने घरांच्या किंमती आकारण्याचा निर्णय घेतल्याने याबाबत म्हाडा कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. यात प्रामुख्याने या घरांना २०२०-२१मध्ये अंशतः भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याने या घरांची किंमत तेव्हा १० हजार रुपये प्रति चौरस फुटांच्या दराने म्हणजे ४४ लाख रुपये निश्चित करण्यात आली होती.
FDA Raid: ‘एफडीए’चा धडाका सुरुच; मालाडमधील Blinkitचा अन्न परवाना तत्काळ निलंबित, काय कारण?मात्र, त्याला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र २०२५-२६मध्ये मिळाल्याने उर्वरित घरांची किंमत ५१ आणि ५२ लाखांपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे एकाच इमारतीत राहणाऱ्या दोन सदनिकाधारकांकडून सारख्याच जागेच्या सदनिकेसाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याने या दरामध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी सदनिकाधारकांनी केली. त्यामुळे एकाच इमारतीत सारख्याच क्षेत्रफळाच्या घरांच्या वेगवेगळ्या किंमती आकारण्यापेक्षा सरसकट सन २०-२१चा रेडी रेकनर दर ग्राह्य धरून किंमत करून आकारण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालकांना दिले.
FDA Raid: काजू कतलीमध्ये जिवंत अळ्या असल्याची तक्रार, FDA ने तत्काळ धाड टाकली; काय-काय आढळून आलं?रहिवाशांना दिलासा
या गृह प्रकल्पातील सोडतीमध्ये ज्या ४३४ लाभार्थ्यांनी आपली स्वीकृती पत्रे म्हाडाकडे जमा केली आहेत, त्यांना दिलासा द्यावा. तर, उर्वरित घरांसाठी नवीन दरानुसार नव्याने लॉटरी काढण्यात यावी, असे निर्देश शिंदे यांनी या बैठकीत दिले. त्यामुळे आता या गृहप्रकल्पातील घरांची नव्याने सोडत होणार असून, २०२०-२१च्या रेडी रेकनर दराप्रमाणे म्हणजे ४४ ते ४६ लाखांत ती नागरिकांना उपलब्ध होतील.

