जिल्ह्यात ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदाची कोणतीही भरती सुरू नसतानाही अज्ञात व्यक्तींकडून निवड झाल्याचे सांगून फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पोलिसांना चौकशीसाठी पत्र दिले होते.
Eknath Shinde : धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?दरम्यान, दोन जणांनी १३ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली. उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी महसूल अधिकारी अनिल भगत यांना पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी अधिकृत केले.
तक्रारीनुसार, अजिनाथ ज्ञानेश्वर वरकड यांच्या पत्नीला तलाठी पदावरील नियुक्तीचा आदेश १० ऑगस्ट रोजी rdcchsngr@gmail.com या बनावट ई-मेलवरून पाठविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात पडताळणी केल्यानंतर तो आदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
आरोपींनी २४ फेब्रुवारीपासून सुभेदारी विश्रामगृह, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीत आठवड्यातून तीन दिवस प्रशिक्षण घेतले. पुणे व कोल्हापूरहून प्रशिक्षक येत असल्याचे सांगण्यात आले. महसूल संगणकीय कामकाजासाठी तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या बनावट स्वाक्षरीची पत्रेही देण्यात आली. तक्रारीनुसार, अजिनाथ यांनी पत्नीच्या नियुक्तीसाठी ऑनलाइन साडेसहा लाख आणि रोख सात लाख, असे एकूण १३ लाख ५० हजार रुपये दिले. तसेच अक्षय गायकवाड यांच्या भावाकडून २८ लाख रुपये उकळण्यात आले.
Maratha Reservation : मराठवाड्यात किती मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप? महत्त्वाची आकडेवारी समोरव्याप्ती वाढण्याची शक्यता
अर्जदारांसोबत अन्य काही व्यक्तींनाही अशाच प्रकारे तलाठी पदाचे नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत. आरोपींच्या या टोळीने आणखी किती जणांकडून पैसे उकळले, याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बनावट सही-शिक्के
कार्यालयीन अभिलेखांशी पडताळणी केली असता नियुक्ती आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

