Headlines

Sushma Andhare Vs Jaykumar Gore; Political Controversy In Maharashtra


शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि कोविड काळात पैसे लाटल्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड

.

सुषमा अंधारेंना चुकीचे ब्रीफिंग दिले जात आहे

सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना गोरे म्हणाले, “त्या माझ्या भगिनी आहेत आणि मी त्यांचा सन्मान करतो. पण मला असे वाटते की त्यांना अत्यंत चुकीची माहिती दिली जात आहे. जो माणूस सामान्य कुटुंबातून येऊन राज्यात काम करतो, त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय यातना भोगल्या आहेत, याचा विचार त्यांनी करायला हवा होता. मला उपमा देण्यापूर्वी त्यांनी वस्तुस्थिती तपासायला हवी होती.”

मी कधीही कुणाच्या वाटेला जात नाही, पण…

आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना गोरे म्हणाले, “गेल्या 20 वर्षांपासून प्रस्थापितांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही. माझ्यावर 18 गुन्हे दाखल झाले, ज्यापैकी 15 गुन्ह्यांतून मी निर्दोष मुक्त झालो आहे. मी कधीही विनाकारण कुणाच्या वाटेला जात नाही किंवा कुणाचे वाईट करत नाही. पण जर कुणी विनाकारण मला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मी उत्तर द्यायला कमी पडत नाही.”

कोविडमधील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले

सुषमा अंधारे यांनी कोविड काळात रुग्णांच्या नावावर पैसे लाटल्याचा जो गंभीर आरोप केला होता, तो गोरे यांनी ठामपणे फेटाळून लावला. “कोविडच्या काळात मी माझ्या स्वखर्चाने आणि कर्ज काढून साडेतीन कोटी रुपये उपचारासाठी खर्च केले. सुमारे 4,000 कोविड रुग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवण्याचे काम मी केले आहे, याचे सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहेत. माझ्यावर आरोप करण्यासाठी जे खोटे रेकॉर्ड तयार करण्यात आले होते, त्यातील आरोपींचा जामीन आजच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे,” असे गोरे यांनी स्पष्ट केले.

कुटुंब आता अशा आरोपांसाठी तयार आहे

सतत होणाऱ्या आरोपांबद्दल खंत व्यक्त करताना ते म्हणाले, “महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांनाही चांगलं काम करताना त्रास सहन करावा लागला होता. त्यांच्या तुलनेत मी फार लहान आहे. अशा खोट्या आरोपांमुळे वाईट नक्कीच वाटते, वेदना होतात. मलाही कुटुंब, मुले आणि पत्नी आहे. पण आता अशा सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी माझे कुटुंब आणि मी पूर्णपणे तयार आहोत.”

पृथ्वीराज चव्हाणांवरही निशाणा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, गोरे यांनी वयाचा संदर्भ देत टोला लगावला. “पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. पण आता अशा वयात अशी वक्तव्ये होत असतात, त्यामुळे ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असे गोरे म्हणाले.

हेही वाचा…

भाजपला संविधान गुंडाळायचंय, मनुस्मृतीच्या माध्यमातून देश चालवायचाय!:हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल; 22 ऑगस्टला राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याचीही दिली माहिती

“भारतीय जनता पक्षाला या देशातील संविधान गुंडाळून ठेवायचे आहे आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून हा देश चालवायचा आहे. त्यामुळेच अशा मनुवादी प्रवृत्ती आजही समाजात पाहायला मिळत आहेत,” असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपची ‘तिरंगा रॅली’, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा झालेला कथित अपमान आणि आगामी काळात राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याबाबत सविस्तर भाष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत