Suchitra Bandekar Margashirsh Fast Memory : घरात अजिबातच लक्ष्मी नाही म्हणून बहिणीचा मार्गशीर्षातल्या व्रताचा सल्ला, चौथ्याच गुरुवारी एक अनोळखी आजीबाई घरात आलेल्या… सुचित्रा बांदेकर यांनी संघर्षातला किस्सा शेअर केला.

अभिनेत्री सुचित्रा बांदेकर वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यांच्या संघर्षाच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देतात. अशाच एका मुलाखतीमध्ये त्यांनी काळाचौकी मधल्या एका घरात केलेल्या मार्गशीर्षातला गुरुवारचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, मला माझ्या बहिणीने मार्गशीर्षातल्या गुरुवारचे व्रत करण्याचा सल्ला दिला होता. आता या घडीला तुझ्याकडे अजिबातच पैसे किंवा लक्ष्मी नाही त्यामुळे तू हा उपवास करून बघ असं ती मला म्हणाली. त्यावेळी आम्ही काळाचौकी येथे राहायचो. तेव्हा मी त्या गुरुवारचे व्रत केलेले. मला म्हणाली की तू कलश वगैरे काही नाही लावलास तरी चालेल फक्त एक छोटासा फोटो लाव आणि महिनाभर शाकाहारी अन्नपदार्थ खा. आणि ती पोथी वाच. देवीपुढे जो काही तुला नैवैद्य करता येईल तो दाखवा आणि तू दिवसभर उपवास कर. मी त्यावेळी उपवास करायचे.
Kishori Godbole : साडेचार वर्ष अधुरी एक कहाणी मालिकेत काम, खबरदारही केला पण एवढं करुनही प्रेक्षक विसरले! किशोरी गोडबोलेची खंत
पहिल्याच मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी मी पोथी वाचून आदेश कधी घरी येईल याची वाट पाहत होते. त्यावेळी संध्याकाळी सात वाजता एक आजी अचानक माझ्या घरी आल्या. त्या अचानक आल्या त्यामुळे मला काहीच कळलं नाही की त्या कोण आहे, कुठून आल्या वगैरे… त्यांनी माझ्याकडे पाणी मागितल्यावर मी त्यांना ते दिलं. त्या मला म्हणाला की माझ्या मुलाला भरपूर लागलं आहे, त्याचा एक्सीडेंट झाला आहे. त्या बोलल्यावर मला कसतरी झालं. त्या मला म्हणाल्या की तू मला थोडेसे पैसे दे मला त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. त्यावेळी त्यांना काय बोलायचं हे मला कळतच नव्हतं. आता कोणी विचारलं तर आपण अगदी सहज पाकिटातले पैसे काढून देतो पण तेव्हा अजिबातच पैसे नव्हते त्याचसाठी ते व्रतही केलेलं.
Aditya Srivastava : CID च्या फक्त 26 एपिसोडपुरता दिसणार होता आदित्य श्रीवास्तव, अभिजीतच्या रोलसाठी स्पष्ट नकार, एका निर्णयाने बदललं नशीब
सुचित्रा बांदेकर पुढे म्हणाल्या की, त्यांनी माझ्याकडे फक्त 20 रुपये मागितले. त्यावेळी माझ्याकडे 50 रुपये होते त्यातले 20 रुपये मी त्यांना दिले. त्या खूपच थकलेल्या होत्या त्यामुळे मी त्यांना थांबवलं आणि प्रसादासाठी ठेवलेलं केळ आणि थोडं दूध प्यायला दिलं. त्यांना म्हटलं की तुम्ही आधी खा मग तुम्हाला बरं वाटेल. हे पाहून त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या की, तुझं सगळं चांगलं होईल. त्या घरातून बाहेर पडल्यावर मी देवीकडे त्यांच्या मुलाला बरं वाटावं यासाठी प्रार्थना करू लागले. त्यानंतर मी त्यांना बाल्कनीतून पाहू लागले की त्या आता खाली उतरून येतील आणि मला दिसतील पण त्या बराच वेळ झाला तरीही दिसल्या नाही. मला वाटलं त्या दुसऱ्यांकडेही पैसे घ्यायला गेले असतील म्हणून मी त्यांना बघायला खाली आले पण त्या कुठेच नव्हत्या. सोनचाफा प्रोडक्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला.
सुचित्रा बांदेकर या सिनेमांमध्ये सक्रिय असतात. याशिवाय त्या स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग, पाठराखीण आणि घरोघरी मातीच्या चुली यांसारख्या मालिकांच्या निर्माती आहेत.

