Headlines

रावे अंतर्गत कृषीकन्यांची जिल्हा बँकेला भेट


ओरोस : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, किर्लोस संचलित छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील READY RAWE २०२६-२७ कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. व अथुल्या एम. यांनी सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे शैक्षणिक भेट दिली.
यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून किसान क्रेडिट कार्ड (KCC), शेतकरी पीक कर्ज योजना, कृषी अवजारे खरेदी कर्ज, फळबाग विकास कर्ज, पशुपालन कर्ज तसेच शेतीशी संबंधित विविध कर्ज योजना यांची सविस्तर माहिती देण्यात आली. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, पात्रता, अर्ज प्रक्रिया, कर्ज वितरणाची पद्धत तसेच पतपुरवठ्याबाबतही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.
या भेटीदरम्यान विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. प्रमोदजी जठार यांचीही कृषीकन्यांशी भेट झाली. त्यांनी कृषीकन्यांशी संवाद साधून महाविद्यालयाच्या READY RAWE अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. तसेच शासनाच्या कृषी धोरणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या क्षेत्रभेटीमुळे कृषीकन्यांना कृषी वित्त व्यवस्थापन, बँकिंग सेवा आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने त्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत