Headlines

Somy Ali : ‘मी मरेपर्यंत तो माझा पाठलाग करणं थांबवणार नाही’, सलमान खानबद्दल एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचं वक्तव्य


Somy Ali On Salman Khan : सोमी अलीनं सलमान खानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Somy Ali On Salman Khan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीमुळे चर्चेत आला आहे. सोमीचा दावा आहे की, तिनं स्वतः सलमान खानला मेसेज करून बिश्नोई समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिला होता, पण अभिनेत्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं.

सलमान खानबद्दल काय म्हणाली सोमी अली?

सोमी अलीनं सांगितलं की, तिनं सलमान खानच्या प्रायव्हेट नंबरवर मेसेज पाठवला होता. सोमी म्हणाली, ‘मी सलमान खानला त्याच्या खाजगी नंबरवर मेसेज केला. मी त्याला सांगितलं की अजून वेळ गेलेली नाहीये, तू बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागायला हवी. तू केलेल्या चुकीबद्दल माफी माग. सर्व काही ठीक होईल. पण तो ऐकला नाही.’
Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra फेम निमिष कुलकर्णीची भरारी! अभिनेत्याची मराठी सिनेमात वर्णी; चाहते उत्सुक
सोमी म्हणाली की, तिनं केवळ सलमान खानलाच नाही, तर बिश्नोई समाजालाही आवाहन केलं होतं. अभिनेत्री म्हणाली, ‘मी बिश्नोई समाजाला सांगितलं की, सलमानला मारल्यानं तुमचं काळवीट परत येणार नाही. मी सलमानच्या वतीनं हात जोडून विनंती करते की त्यांनी माफ करावं. मी माझ्या परीनं सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मला त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.’

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

तू मूव्ह ऑन का होत नाहीयेस? असं विचारलं असता सोमी म्हणाली की, ‘सलमान मला जगूच देत नाहीये. हाच तर प्रॉब्लेम आहे. जेव्हा गॅलेक्सी अपार्टमेंट्समध्ये फायरिंग झाली, तेव्हा सलमान दुबईला पळून गेला. दुबईमध्ये, तो माझ्या सावत्र बहिणीला भेटायला गेला, जिच्याशी माझं बोलणं होत नाही, आणि तिच्या मुलानं उघडलेल्या शाळेचं उद्घाटनही त्यानं केलं. तो माझ्याशी संपर्कात राहण्याची संधी शोधतो. त्याला असं करण्याची गरज नव्हती.’
Maharashtra TimesShekhar Suman : ‘अतिशय प्रोफेशनल, इंटिमेट सीनदरम्यानही स्टार असल्याचा आव आणला नाही’, शेखर सुमननं सांगितला रेखा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव
‘जोपर्यंत मी मरत नाही, तोपर्यंत तो माझा पाठलाग करणं थांबवणार नाही.’, असंही सोमी अली म्हणाली. निधी वासंदानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोमी बोलत होती.
Maharashtra Times‘लोकशाही असलेल्या देशात हे सगळं सुरुये, माणसाची किंमत कमी झाली’, CJP आंदोलनाला मराठी कलाकारांचा पाठिंबा

काळवीट प्रकरण काय आहे?

‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजस्थानमधील जोधपूर येथे दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला होता. बिश्नोई समुदाय काळवीटांना पवित्र मानतो आणि या मुद्द्यावरून आंदोलनं सुरू आहेत. २०१८ मध्ये, जोधपूर न्यायालयानं सलमान खानला दोषी ठरवून पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण, नंतर त्याला जामीन मंजूर झाला आणि हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. या प्रकरणासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून सलमानला अनेक धमक्या मिळाल्या आहेत.