लहान मुलासह पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतील CJP आंदोलनातील महिलेचा PM मोदी-फडणवीसांवर संताप – woman confronts police at cjp protest, criticizes pm modi and cm devendra fadnavis
लहान मुलासह पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतील CJP आंदोलनातील महिलेचा PM मोदी-फडणवीसांवर संताप – woman confronts police at cjp protest, criticizes pm modi and cm devendra fadnavis
दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मुंबईतून मोठा प्रतिसाद मिळाला. दादरमधील चैत्यभूमी परिसरात नागरिकांनी एकत्र येत शांततेत निदर्शने केली. मात्र यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झालेला. यादरम्यान लहान मुलासह असलेली आई पोलिसांवर संतापल्याचे अनेकांनी पाहिले. आम्हाला संरक्षण नको, असे म्हणणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. आंदोलनात सहभागी झालेल्या संध्या पानसकर यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केलेला. संरक्षण द्यायचं तर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांपासून द्या, असा हल्लाबोल पानसकरांनी केला.