Shubha Godbole : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या कॅन्सरच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

शुभा गोडबोले यांची पोस्ट
शुभा गोडबोले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘माझा प्रवास…कधी कधी आयुष्य आपल्याला अशा प्रकारे बदलून टाकतं, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते…काही दिवसांपूर्वी मी माझ्या ‘Chemo Curls’ बद्दल एक पोस्ट केली होती. ती पोस्ट इतक्या लोकांपर्यंत पोहोचेल, २० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळतील असं खरंच वाटलं नव्हतं. माझ्यावर प्रेमाचा, शुभेच्छांचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार.’
Gargi Phule : ‘रवी काका खूप हँडसम होते, पाच-सहा मुली त्यांच्या मागे असायच्या’, गार्गी फुले यांनी सांगितला रवींद्र महाजनींचा किस्सा
‘पण आज जेव्हा मी माझे तेव्हाचे आणि आताचे फोटो पाहते, तेव्हा मला जाणवतं…माझ्यात झालेला सर्वात मोठा बदल माझ्या केसांमध्ये नाही. तो माझ्यात झाला आहे. कॅन्सर हा शब्द ऐकताच आपल्या मनात सर्वात आधी एकच भावना निर्माण होते, भीती आणि माझ्या अनुभवातून मला एक गोष्ट जाणवली आहे…कॅन्सरशी लढाई ही जितकी शारीरिक असते, तितकीच, कदाचित त्याहूनही अधिक, ती मानसिक असते. मी डॉक्टर नाही. त्यामुळे डॉक्टरांचं काम त्यांना करू देऊया. औषधं त्यांचं काम करतील. केमोथेरेपी तिचं काम करेल. पण तुमचं काम एकच, तुमचं मन खंबीर ठेवणं आणि इथेच मला वाटतं, कदाचित मी कोणासाठी तरी काही फरक घडवून आणू शकते.’
‘लोकशाही असलेल्या देशात हे सगळं सुरुये, माणसाची किंमत कमी झाली’, CJP आंदोलनाला मराठी कलाकारांचा पाठिंबा
‘मी माझ्या आजारपणाबद्दल फारसं बोलू इच्छित नव्हते. कारण लोकांना काळजीपोटी का होईना, पण पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलायचं असतं. त्यामुळे मी 6/7 महिने फोन घेणंही टाळलं. मी मात्र सतत पुढे पाहत राहिले. “मी बरी झाल्यावर काय करणार?” याचा विचार करत राहिले. पुढचे प्रवास, पुढची स्वप्नं, मला आवडणाऱ्या गोष्टी…मी आजारपणाच्या पलीकडचं आयुष्य मनात सतत जगत राहिले आणि आज, जेव्हा मी त्या प्रवासातून बरी होऊन बाहेर आले आहे, तेव्हा मला वाटतं, आता माझी गोष्ट सांगू शकते. कारण मला वाटतं, या सगळ्या प्रवासात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, स्वीकार- acceptance. एकदा आपण मनापासून सर्वात worst case scenario म्हणजे वाईट शक्यता स्वीकारली…त्यानंतर त्यापेक्षा जे काही चांगलं घडतं, ते सगळं बोनस असतं. कॅन्सर आणि केमोथेरेपी आपल्याकडून खूप काही हिरावून घेतात. केस, शरीराची ताकद, रोजचं आयुष्य, आणि आपल्या शरीरावरचा आपला स्वतःचा ताबा असल्याची भावना…असे अनेक दिवस असतात, जेव्हा आपलंच शरीर आपल्याला अनोळखी वाटायला लागतं.’
‘पण या सगळ्या प्रवासात मी एक निर्णय घेतला. कॅन्सर ही माझी ओळख होऊ द्यायची नाही. मी शक्य तितकं माझं आयुष्य जगत राहिले. माझी विनोदबुद्धी जपली. स्वप्नं पाहणं थांबवलं नाही. प्रवासाचे प्लॅन्स केले. मला आवडणाऱ्या गोष्टी करत राहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, पुढे पाहत राहिले. मी नेहमीच खंबीर होते का? नाही. मला भीती वाटली का? थोडी. पण या प्रवासाने मला एक गोष्ट शिकवली…मानसिकदृष्ट्या खंबीर असणं म्हणजे आपल्याला कधीच भीती, दुःख किंवा थकवा जाणवत नाही असं नाही. खंबीरपणा म्हणजे या सगळ्या भावना असूनही, त्यांना आपली आशा हिरावून घेऊ न देणं. आज माझ्या या कुरळ्या केसांकडे पाहताना मला फक्त केमोथेरेपीनंतर उगवलेले केस दिसत नाहीत. मला एक आठवण दिसते. मी काय काय सोसलं आणि त्यातून मी कशी बाहेर आले. कदाचित म्हणूनच माझा हा प्रवास मी आता थोडा अधिक मोकळेपणाने तुमच्याशी शेअर करू इच्छिते.
माझ्या अनुभवातून कॅन्सर किंवा केमोथेरेपीमधून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर थोडंसं धैर्य मिळालं, थोडीशी आशा मिळाली किंवा फक्त एवढंच जरी वाटलं की, “मी एकटा/एकटी नाही…” तर माझी ही गोष्ट सांगणं सार्थक आहे.’
Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली
‘मला या प्रवासातून जाणाऱ्या लोकांशी जोडून घ्यायला आवडेल. मी कोणतीही तज्ज्ञ नाही आणि माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरंही नाहीत. पण मी त्या वाटेवरून चालून आले आहे आणि मला माहीत आहे, तो प्रवास कसा असतो. कधी कधी आपल्याला फक्त कोणीतरी एवढंच सांगावं असं वाटतं, “मी हे सगळं अनुभवलं आहे. तूही यातून नक्की बाहेर पडशील.” आणि माझ्या या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे, माझं कुटुंब, माझे मित्र-मैत्रिणी, माझे डॉक्टर आणि माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या, मला प्रेम आणि शुभेच्छा देणाऱ्या तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार…’ असं म्हणत शुभा यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

