Headlines

Snigdha Homestay Entrepreneur Success Story ; Success Story : बाळासाठी नोकरी सोडली तेव्हा वाटलं करिअर संपलं, आता घरबसल्या 21 लाख रुपयांची कमाई


मुलाला वेळ देता येत नाही, या अडचणीतून सुरू झालेल्या व्यावसायिक प्रवासाने आज 21 लाख रुपयांच्या महसूलाचा टप्पा गाठला आहे. ज्या महिलेने कधी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम केले नाही अशा महिलेने कसलाही अनुभव नसताना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात स्वतःचे बीज रोवले आहे. हे बीज हळूहळू वटवृक्षाचे आकार घेत आहे. स्निग्धा आधी कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत होत्या. पण नोकरीच्या ठराविक वेळेमुळे मुलाला वेळ देणे त्यांना जमत नव्हते. तसेच त्यांच्या मुलालाही आईपासून दूर राहता येत नव्हते. शेवटी मुलासाठी त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला.

नोकरी सोडल्यानंतर त्यांनी विविध व्यवसायासंबंधित रिसर्च करण्यास सुरुवात केली. त्यांनी शॉर्ट टर्म रेंटल व्यवसाय कसा चालतो? या संदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासंबंधित अभ्यास केल्यानंतर त्यांनी त्यांच्या मालमत्तेला Airbnb वर सूचीबद्ध केले. या व्यवसायाचा पाया त्यांनी दिल्लीत उभारला.

विशेष म्हणजे अगदी पहिल्याच दिवशी त्यांना बुकिंग मिळाली. अगदी पहिल्याच दिवशी वाटेला थोडे यश येणे त्यांच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारे ठरले. स्निग्धा यांनी शॉर्ट टर्म रेंटल व्यवसायातून 3 वर्षांत सुमारे 21 लाखांचा महसूल उभा केला.

शॉर्ट टर्म रेंटल व्यवसाय म्हणजे काय?

शॉर्ट टर्म रेंटल व्यवसायात घर किंवा एखादी मालमत्ता वर्षांसाठी भाड्याने देण्याऐवजी दिवसांसाठी किंवा आठवड्यासाठी भाड्याने दिली जाते. ग्राहकाच्या गरजेनुसार ग्राहकाला सेवा पुरवण्यात येते. तसेच दिवसाच्या रेटप्रमाणे भाडे आकारण्यात येते. जर तुमच्याकडे अशी मालमत्ता आहे जी वापरात नाहीये, त्यापासून तुम्ही हा व्यवसाय उभारू शकता. तुमची मालमत्ता Airbnb वर सूचीबद्ध करून ग्राहक मिळवता येते.

या व्यवसायात तुम्ही मालकासह जागेचे ऑपरेटरही असता त्यामुळे बुकिंग सांभाळणे, जागेची वेळोवेळी साफसफाई करणे, मालमत्तेची देखभाल करणे तसेच काही बिघाड झाल्यास त्वरित दुरुस्ती करणे आणि ग्राहकांकडून चांगले Reviews मिळवणे या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागते. एक लक्षात ठेवा ‘चांगले Reviews म्हणजे जास्त ग्राहक आकर्षित होतील.’ तुमच्या मालमत्तेत राहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांशी वेळोवेळी संपर्क ठेवावा लागतो, त्यांच्या सोयीसुविधांविषयी खबरदारी घ्यावी लागते. तसेच चेक इन-चेक आऊटचे व्यवस्थापन करावे लागते.

Maharashtra Timesडॉलर घसरला, भारतीय चलनाला बळकटी, शेअर मार्केटही सुसाट; आता पुढे काय?या व्यवसायात विविध खर्चही असतात. जर तुम्ही व्यवसाय करण्यासाठी एखादी जागा भाड्यावर घेतली असेल तर त्या मालमत्तेचे भाडे, वीज, फर्निचर तसेच Airbnb ला प्रत्येक बुकिंगवर द्यावी लागणारे शुल्क आणि कमावलेल्या नफ्यावर आयकर विभागाला द्यावे लागणारे कर या सगळ्या गोष्टींमागे होणारा एकूण खर्च लक्षात घ्यावा लागतो. जर मालमत्ता स्वतःची असेल तर उत्तम. पण नसेल तर व्यवसायासाठी मालमत्ता वापरण्याआधी जागेच्या मालकाची परवानगी घ्यावी लागते. त्या ठिकाणचे सोसायटी रूल्स तसेच इतर स्थानिक नियम लक्षात घ्यावे लागतात. मुळात, या व्यवसायाचा फायदा असा की यातून व्यावसायिकाला Flexibility मिळते. व्यक्तीला त्याच्या वेळेवर अधिक नियंत्रण ठेवता येते.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत