Marathi Actor Reaction On CJP Protest : सीजेपी आंदोलनावर मराठी कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सध्या सर्वत्र ‘ कॉकरोच जनता पार्टी ‘च्या आंदोलनाची चर्चा होत आहे. CJP च्या ‘चलो संसद’ या आंदोलनादरम्यान लाठीमार करण्यात आला. अनेक आंदोलक यामध्ये जखमी झाले आहेत. अशातच याप्रकरणी अनेक मराठी कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लहान मुलासह पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतील CJP आंदोलनातील महिलेचा PM मोदी-फडणवीसांवर संताप
सुबोध भावेची पोस्ट
मराठी अभिनेता सुबोध भावेनं फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘संवाद – तो नसतो तेव्हा विसंवाद सुरू होतो. आंदोलन करणारे तरुण ही याच देशाचे आहेत आणि काठ्या चालवणारे ही. निर्णय घेणारे ही याच देशाचे आहेत आणि भरडले जाणारे ही. हा प्रश्न या देशातील स्वप्न बघणार्या लाखो तरुणांच्या किंबहुना आपल्याच देशाच्या भविष्याचा आहे. ज्यांच्या हातात निर्णय घेण्याची क्षमता आणि अधिकार आहेत त्यांनी संवेदनशील होऊन निर्णय घ्यावा हीच विनंती आणि ईच्छा. भारतीय एकमेकांशी झुंजताना पाहणं ही काही फार सुखावह गोष्ट नक्कीच नाही. शरीरावर झालेल्या जखमा भरून येतील, पण मनावर झालेल्या जखमा खोल जाण्याआधी संवाद घडो हीच प्रार्थना…जय हिंद… फक्त एक भारतीय नागरिक.’
पूर्वा कौशिकची पोस्ट
त्याचबरोबर मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिकनंही याप्रकरणी व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले आहेत. पूर्वा कौशिक म्हणतेय की, ‘मला खरंच वाटलं नव्हतं की, मी असा एखादा व्हिडिओ वगैरे शूट करेन. मी या धाटणीची मुलगी नाहीये. पण, काही गोष्टी खरंच सहन होत नाहीत. खूप हेल्पलेस वाटतंय. आपण कुणीच काहीच करू शकत नाही, याचं वाईट वाटतं. माणसं मरत आहेत. लोकशाही असलेल्या देशात हे सगळं सुरुये. बरं आताही मी जे काही बोलतेय ते पोस्ट केलं किंवा शेअर केलं तर वाटणार की, भाई इतकं काय झालंय? त्यात काय एवढं? इतका दिखावा का करतेय याच सगळ्या गोष्टी बोलल्या जाणार..मग हे कुठून कुणाशी बोलायचं? इन्स्टाग्रामवर किती पाठिंबा देणार? नेमकं काय करायचं…कोणाला काहीच कळत नाहीये. आपण सध्या काय करतोय दोन वेळचं खातोय, झोपतोय. पण, आपल्यासाठीच जे लोक लढत आहेत त्यांचं काय होतंय…त्यांना आपण कोणत्या पद्धतीने मदत करू शकतो हे पाहावं लागेल. हे जे काही सुरू आहे, ते लवकरात लवकर थांबावं…कारण, माणसाची किंमत इतकी कमीये हे मला माहिती नव्हतं.’
‘मला आज माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. मी इतकी अस्वस्थ आणि उदास होते की शेवटी मी हा व्हिडिओ बनवला. मला माहीत आहे की, लोक यावर खूप काही बोलतील आणि लोकांची वेगवेगळी मतं असतील. पण आज मला पूर्णपणे हेल्पलेस वाटतंय. माझ्या मनातील भावना मला दाबून ठेवता आल्या नाहीत, म्हणून मी रडले.’ असं पूर्वा शेवटी म्हणाली.
तसेच अभिनेत्री रसिका सुनीलनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘घरी पोहोचल्यावर आज अखेर इंस्टाग्रामवरील दिवसभरातील त्या सगळ्या भयावह पोस्ट पाहण्याची संधी मिळाली. हे सगळं पाहून मन अक्षरशः तुटत आहे. असहाय्य वाटतंय, रागही येतोय. हे अजिबात योग्य नाही! लाज वाटली पाहिजे… लोकशाहीला श्रद्धांजली. एखाद्याला इतकंसं समजावून सांगण्यासाठी कुणीतरी पटकथा लिहून द्यावी लागेल का, की संवाद हाही एक पर्याय असू शकतो?’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा