Shocking incident in pimpri chinchwad drunken youth threatened police later issued public apology; पुण्यात भररस्त्यात पोलिसांच्या अंगावर धावला, नशेत मस्ती दाखवली; पण दणक्यानंतर तरुण गुडघ्यावर आला
Shocking incident in pimpri chinchwad drunken youth threatened police later issued public apology; पुण्यात भररस्त्यात पोलिसांच्या अंगावर धावला, नशेत मस्ती दाखवली; पण दणक्यानंतर तरुण गुडघ्यावर आला
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: दारूच्या नशेत बेफाम वाहन चालवायचं, वाहनाला धडक देऊन थेट डिव्हायडरवर गाडी आदळवायची आणि त्यानंतर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांनाच अश्लील शिवीगाळ करत दमदाटी करायची… हा सगळा प्रकार पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. शशांक प्रशांत खानवलकर हा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत बेफाम वाहन चालवत होता. एका वाहनाला धडक दिल्यानंतर त्याची गाडी थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली.
या घटनेनंतर वाकड पोलिसांनी त्याला अडवत, इतरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवू नये, अशी समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या शशांकने पोलिसांनाच अरेरावी करण्यास सुरुवात केली. ‘तुमच्या कमिश्नरला बोलवा, मी इथेच आहे’, अशा शब्दांत त्याने पोलिसांना आव्हान दिलं. एवढंच नाही तर पोलिसांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत त्यांना अश्लील शिवीगाळ केली.
‘कमिश्नरला बोलव… मी इथेच आहे!’
व्हायरल व्हिडिओमध्ये शशांक पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे. पोलिसांना उद्देशून तो कमिश्नरला बोलावण्याचे आव्हान देतो. तसेच पोलिसांवर गंभीर आरोप करत अश्लील भाषेत शिवीगाळ करतो. ‘मी मराठी आहे… तुम्हाला लाज वाटते का?’ असं म्हणत तो पोलिसांवरच दादागिरी करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पोलिसांशी अशा पद्धतीने वर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
वाकड पोलिसांनी शशांक खानवलकरविरोधात कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला असून त्याला कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र, या सगळ्या राड्यानंतर काही तासांतच चित्र पूर्णपणे बदललं. दारूची नशा उतरली आणि पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या शशांकला आपल्या कृत्याची जाणीव झाली. त्याने व्हिडिओ तयार करून पोलिसांची जाहीर माफी मागितली.
‘मी जे बोललो ते अनावधानाने झालं. पोलीस माझ्या मदतीसाठी तिथे आले होते. माझ्याकडून पोलिसांबाबत जे वक्तव्य झालं त्यासाठी मी माफी मागतो. यानंतर मी कधीही असं करणार नाही,’ असं म्हणत त्याने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. एकीकडे पोलिसांसमोर दादागिरी… कमिश्नरला बोलावण्याचं आव्हान… तर दुसरीकडे नशा उतरल्यावर जाहीर माफी, अशा या घटनेची शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे. मात्र, या घटनेने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे, दारूच्या नशेत कायदा हातात घेण्याची आणि थेट पोलिसांनाच धमकावण्याची हिंमत येते कुठून? कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ आणि दमदाटी केली जात असेल, तर अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा