Manoj jarange march to mumbai clear instructions for protesters not to go to azad maidan or varsha residence; मुंबईत जायचं की नाही, पुढील आंदोलनाची दिशा कशी असणार? मनोज जरांगेंनी मराठ्यांना सांगितला गनिमी कावा
Manoj jarange march to mumbai clear instructions for protesters not to go to azad maidan or varsha residence; मुंबईत जायचं की नाही, पुढील आंदोलनाची दिशा कशी असणार? मनोज जरांगेंनी मराठ्यांना सांगितला गनिमी कावा
योगेश काकफळे, जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 3 दिवस असून आज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे. 6 सप्टेंबरनंतर राज्यातील मराठा समाजाने टप्प्याटप्प्याने मुंबईकडे कूच करावे आणि 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचावे, असे आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मात्र मुंबईत पोहोचल्यानंतर आझाद मैदान किंवा वर्षा निवासस्थानी कोणीही जाऊ नये, तसेच पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.
मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबई आंदोलनाचा प्लॅन जाहीर केला. आजपासूनच मुंबईला जाण्याचे नियोजन करा, 6 सप्टेंबरनंतर टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल व्हा आणि 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचा, असे त्यांनी सांगितले. मुंबईत पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आझाद मैदान किंवा वर्षा निवासस्थानाकडे जाऊ नये. त्याऐवजी पाहुणे, मित्र किंवा परिचितांच्या घरी थांबावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. पोलिसांनी आंदोलकांना तेथून नेले तरी घाबरू नका, तसेच पोलिसांना कोणताही त्रास देऊ नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारसोबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला. सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी अंतरवाली सराटी येथे यावे. आमची दारे चर्चेसाठी खुली आहेत, मात्र मुंबईत चर्चा होणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकडे जाण्याच्या निर्णयावरही जरांगेंनी भाष्य केले. गणेशोत्सव आमचा आहे, आम्ही गणेशोत्सवात मुंबईत जाणार, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
यावेळी मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यावरही जरांगेंनी टोला लगावला. 24 तासांत संपर्क साधू म्हणतात, मात्र माझ्याशी अद्याप कोणाचाही संपर्क झालेला नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही जरांगेंनी प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, 12 सप्टेंबरदरम्यान मुंबईत उपोषण करण्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसंच रद्द करण्यात आलेली 4 जात प्रमाणपत्रे परत द्यावीत आणि 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे आता 6 सप्टेंबरनंतर मराठा समाजाची मुंबईकडे टप्प्याटप्प्याने होणारी कूच आणि 12 सप्टेंबरपासून सुरू होणारे उपोषण , याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा