Headlines

Aditi Tatkare PRO Ashish Mete dies after falling at Mumbai Bhandup Road; शतपावली घालताना कोसळले, आदिती तटकरेंचे PRO आशिष मेटे यांचा अकस्मात मृत्यू, डोक्याला दुखापत झाल्याची माहिती


Aditi Tatkare PRO Death : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयात पीआरओ म्हणून काम पाहणाऱ्या आशिष मेटे यांचा अकस्मात मृत्यू झाला

Ashish Mete Aditi Tatkare Maharashtra Times
आशिष मेटे (उजव्या बाजूला मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबतचा संग्रहित फोटो)(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयात पीआरओ म्हणून काम पाहणाऱ्या पदाधिकाऱ्याचा अकस्मात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशिष मेटे असं मयत तरुणाचे नाव आहे. जेवण झाल्यानंतर मुंबईतील भांडुप परिसरातील एका इमारतीच्या आवारात फिरत असताना आशिष अचानक जमिनीवर कोसळले. खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती आहे.

कोण होते आशिष मेटे?

आशिष मेटे हे मंत्री अदिती तटकरे यांच्या थेट शासकीय सेवेत नव्हते, तर एका जनसंपर्क कंपनीच्या माध्यमातून पीआरओ म्हणून काम पाहत होते. अदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी संबंधित प्रसिद्धी आणि जनसंपर्काची कामं मेटे हाताळत असल्याचं समजतं.

Maharashtra TimesNepal Flood : घरापासून दीड किमीवर, भारतीय इंजिनिअर नेपाळ महापुरातून थोडक्यात वाचला, पत्नी-मुलगी वाहून गेल्या; म्हणतो, दुडूदुडू धावणाऱ्या बाळाची मिठी कशी विसरु?
आशिष मेटे रविवारी रात्री जेवण केल्यानंतर इमारतीच्या परिसरात शतपावली करत होते. त्यावेळी ते अचानक कोसळले. त्यांना चक्कर आली की अन्य काही कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

भांडुप पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेची प्राथमिक चौकशी सुरु केली असून आशिष मेटे यांची बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आशिष यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे मेटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मित्र, नातेवाईक यांच्यासह राजकीय वर्तुळातही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maharashtra TimesDelhi Crime : पडदे लोटून आक्षेपार्ह हावभाव, 16 वर्षीय तरुणीवर स्लीपर बसमध्ये अत्याचार, कंडक्टर-ड्रायव्हरला अटक

सोशल मीडियावर श्रद्धांजली

“भावपूर्ण श्रद्धांजली आशिष… मागील काही दिवसांपासून आशिषसोबत बोलणे झाले म्हणून नाही दोन दिवसांपूर्वी फोन करण्यासाठी नंबर डायल केलेला.. पण नंतर बोलू म्हणून परत फोन कट केला आणि आज निधनाची बातमी..! आशिषजी..३ सप्टेंबरला आपण भेटणार होतो संभाजीनगरला… मित्रा, भावपूर्ण श्रद्धांजली…!” अशा शब्दात राजकीय विश्लेषक संदीप तिकटे यांनी ‘एक्स’वरुन शोक व्यक्त केला आहे.