Shiv Sena Hearing : शिवसेना ठाकरेंची हे पटवून देणारे कपिल सिब्बलांचे १० महत्वाचे मुद्दे, केस फिरणार? – 10 importatant points of kapil sibal shiv sena supreme court argument explained
Shiv Sena Hearing : शिवसेना ठाकरेंची हे पटवून देणारे कपिल सिब्बलांचे १० महत्वाचे मुद्दे, केस फिरणार? – 10 importatant points of kapil sibal shiv sena supreme court argument explained
शिवसेना नेमकी कोणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह कोणाकडे राहणार? महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रश्नाचं उत्तर आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शोधलं जातंय. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना म्हणून दिलेली मान्यता आणि धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी साडे सहा दिवस युक्तिवाद केला. यानंतर आता ठाकरेंच्या बाजूनं देवदत्त कामत हे युक्तीवाद करतील आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वकीलांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळेल. कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर ही केस ठाकरेंच्या बाजूनं फिरू शकते अशी चर्चा सुरु झाली. पण अशी चर्चा सुरु होण्याचं नेमकं कारण काय आहे? सिब्बल यांनी सहा दिवस केलेल्या युक्तिवादाचा मतितार्थ नेमका काय? सिब्बलांच्या युक्तीवादातील सर्वात महत्त्वाचे १० मुद्दे कोणते? आणि ते शिवसेना-धनुष्यबाणाच्या वादासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात…