Headlines

Share Market Crash Prediction; शेअर बाजारावर पुन्हा महामंदीचे सावट, तेजीचा फुगा लवकरच फुटणार; 1987 च्या ‘ब्लॅक मंडे’सारखी घसरण होणार


Stock Market Crash Prediction: देश-विदेशातील शेअर बाजार आताकुठे तेजीच्या रुळावर कमबॅक करत आहेत की इतक्यात पुन्हा एकदा इक्विटी मार्केटमध्ये घसरणीचा इशारा देण्यात आला आहे. “शेअर बाजारात मोठी घसरण होणार आहे,” असे 2008 मंदीचे भाकीत करणारे प्रख्यात फंड मॅनेजर मायकल बरी म्हणतात.अमेरिकन बाजाराने उच्चांक गाठला असून इथून पुढे मोठी घसरण होणार आहे.

Michael Burry Wall Street Crash Prediction
शेअर बाजारात 1987 च्या ‘ब्लॅक मंडे’सारखी घसरण होणार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Market Crash Outlook: जागतिक शेअर बाजारांमध्ये सध्या विक्रमी तेजीची लाट उसळली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या खिशात पैशांचा खळखळाट होत असताना अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूकदार आणि फंड मॅनेजर मायकल बरी यांनी पुढील काळात मोठी घसरण होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.

मायकल बरी यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. देश-विदेशातील शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये बरी प्रख्यात आहेत. याच व्यक्तीने 2008 मध्ये आर्थिक संकटाचे अचूक भाकीत करून बाजारातील गुंतवणूकदारांना वेळीच सावधगिरीचा इशारा दिला होता. त्या वेळी अमेरिकेतील गृहनिर्माण बाजारपेठ कोसळली, ज्याचा परिणाम अमेरिकेसह जगभरातील बाजारांवर झाला.

Maharashtra Timesदादागिरी करता-करता अमेरिका बनला भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार! आखाती देशांनाही मागे टाकले

मायकल बरी यांचा मार्केट क्रॅशचा इशारा

एवढेच नाही तर, अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही झाला होता आणि आता त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या क्रॅशचा इशारा दिला आहे. बरी म्हणतात की ही घसरण 1987 च्या ‘ब्लॅक मंडे’सारखी असेल, ज्यात गुंतवणूकदारांची संपत्ती बेचिराख झालेली.

मायकल बरी म्हणतात की, अमेरिकेन शेअर बाजारांमध्ये सध्या जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे, ज्याचा शेवट मोठ्या घसरणीचा होऊ शकतो. 1987 च्या शेअर बाजारातील घसरणीसारख्या क्रॅशचा अंदाज व्यक्त केला तर, याआधी सबप्राइम मॉर्गेज क्रॅशचा अंदाज वर्तवला होता जो ‘’द बिग शॉर्ट’ या चित्रपटातही दाखवला गेलेला.

Maharashtra TimesProperty Rules: प्रॉपर्टीची डील करताना TDS भरायला विसरू नका, मालमत्ता खरेदी विक्रीवरील कर नियम बदललेत! आयकराचा नवीन नियम काय?

अमेरिकी शेअर बाजारात विक्रमी तेजी

अमेरिकन शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, विशेषतः एस अँड पी500 आणि नॅसडॅक, नवीन विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत असताना सबट्रॅक पोस्टद्वारे बाजारात मोठ्या घसरणीचा बरी यांनी अंदाज वर्तवला. शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी, अमेरिकन शेअर बाजार तेजीसह बंद झाला. यापैकी एस अँड पी500 निर्देशांकाने विक्रमी उसळी घेतली. डाऊ जोन्स 0.28%, एस अँड पी500 निर्देशांक 0.62% आणि नॅस्डॅक 1.30 टक्के वाढीसह बंद झाला.

शेअर बाजारातील तेजीच्या काळात बरी म्हणाले की प्रमुख निर्देशांक उच्चांकाजवळ पोहोचत आहेत. “माझं अजूनही असं मानणं आहे की बाजार नवीन उच्चांकाजवळ पोहोचण्याची शक्यता आहे, आणि लक्षणीय घसरण होण्यापूर्वी एस अँड पी500 झेप घेत राहील, ज्यामुळे बाजार अचानक आपली दिशा बदलण्यापूर्वी शेअर्समध्ये आणखी गुंतवणूक होईल.”

Maharashtra TimesGold Silver Price Hike: सराफा बाजारात दरवाढीचा धडाका; सोन्याचा भाव 1.50 लाखांच्या पार, तर चांदीतही मोठी वाढ! सणासुदीत खरेदीदारांच्या खिशाला कात्रीतसेच AI स्टॉक्समुळे अमेरिकन बाजारात आलेल्या तेजीला बरी सकारात्मक मानत नाही आणि एआय पायाभूत सुविधांची मागणी अशा वित्तपुरवठा व्यवस्थेद्वारे समर्थित आहे, जी कदाचित शाश्वत नाही. मात्र, अशा अनेक कंपन्या आणि ईटीएफमध्ये शॉर्ट पोझिशन्स घेतल्या आहेत आणि परिस्थिती बदलताच ते आपल्या पोझिशन्स बंद करतील असं त्यांनी म्हटले.

1987 मध्ये अमेरिकन शेअर बाजारात काय घडलेलं?

19 ऑक्टोबर, 1987 दिवस शेअर बाजारासाठी ऐतिहासिक दिवस होता. या दिवशी, डाऊ जोन्स 22% कोसळला आणि वाढलेल्या कर्जामुळे 1987 च्या बाजारातील घसरणीसारखी मोठी घसरण होण्याची भीती वाढली आहे. शेअर बाजारात हा दिवस ‘ब्लॅक मंडे’ म्हणून ओळखला जातो. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या मूल्यात एकाच दिवसात 500 अब्ज डॉलर्सची घट झालेली.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा