Headlines

Milk Price Hike in Maharashtra ; वाढत्या डिझेलच्या किंमतीचा फटका दुधाला! पनीर, दही, ताक महागणार; दोन दिवसांत नव्या किंमती होणार लागू


देशभरात महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काहीच उतार पाहायला मिळत नाहीये. जगभरात राजकीय तणावाचे वातावरण आहे, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण दिसून येत नाहीये. याचा पूर्ण परिणाम देशाच्या बाजारपेठेवर होत आहे. आज मुंबई येथे पेट्रोलचे भाव 111.21 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा भाव 97.83 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या काही महिन्यांपासून या किंमतीमध्ये फार काही बदल आढळून आलेला नाही. अशामध्ये E20 सारख्या मुद्द्यामुळे देशभरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्यात दूध महागणार आहे. आता 1लिटर दुधासाठी ग्राहकांना 2 रुपये एक्सट्रा मोजावे लागणार आहेत. दुधाच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या किंमतीमध्ये 10% पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डिझेलच्या वाढत्या किंमती आणि दूध यांचा काय संबंध?

जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. भारत दरवर्षी 85% ते 90% कच्च्या तेलाची आयात करतो. याच कच्च्या तेलापासून भारतीयांच्या वाहनांचे इंधन (पेट्रोल/डिझेल) तयार होते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम म्हणून भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आकाशाला भिडल्या आहेत. याचा परिणाम फक्त दूध नव्हे तर सगळ्या प्रकारच्या माल वाहतुकीवर होत आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे दुध वाहणाऱ्या वाहनांचा वाहतूक खर्च वाढत आहे, याचा परिणाम दुधाच्या किंमतीवर दिसून येत आहे. भविष्यात पेट्रोल तसेच डिझेलच्या किंमती घसरल्या नाहीत तर माल वाहतुकीच्या वाढत्या खर्चामुळे देशातील इतर गोष्टींच्या किंमतीतही आणखीन वाढ दिसून येऊ शकते.

फक्त डिझेल नव्हे दुधाच्या किंमती वाढण्याला अनेक गोष्टी कारणीभूत

दूध वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे दुधाच्या किंमतीवर परिणाम दिसून आला आहे. दुधाची किंमत 2 रुपये प्रति लिटरने वाढली आहे तर दही, ताक तसेच पनीरसारख्या इतर अनेक दुगजन्य पदार्थांच्या किंमतीमध्ये 10% वाढ दिसून येणार आहे. माल वाहतुकीच्या वाढत्या खर्चासह पॅकेजिंगचा खर्चही 30% ने महागले असल्याचे सांगण्यात येत आहे. दूध खरेदीचा खर्च वाढला आहे. त्याचसह दूध खरेदी करण्याच्या खर्चामध्ये भविष्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता मिल्क प्रोड्युसर अँड प्रोसेसर वेल्फेअर असोसिएशनने वर्तवली आहे.

कधी पासून लागू होणार नव्या किंमती?

Maharashtra TimesVedanta Group : ना उच्च शिक्षण, ना खिशात जास्त पैसे! ‘पटना ते लंडन स्टॉक एक्सचेंज’ अनिल अग्रवालांनी कसे उभारले इतके मोठे साम्राज्य?11 ऑगस्ट 2026 पासून दुधाच्या किंमतीत वाढ दिसून येणार आहे. एकंदरीत, प्रति लिटर दुधाच्या किंमतीमध्ये 2 रुपयांची वाढ होणार आहे. परिणामी, इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीतही वाढ दिसून येणार आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत