Shocking case of fraud of woman by pune company in her foreign job placement; महिलेला पुण्यातील कंपनीकडून परदेशात नोकरीची ऑफर, पण तिथं पोहोचताच धक्कादायक प्रकार; पळून माघारी येताच सांगितली आपबीती
Shocking case of fraud of woman by pune company in her foreign job placement; महिलेला पुण्यातील कंपनीकडून परदेशात नोकरीची ऑफर, पण तिथं पोहोचताच धक्कादायक प्रकार; पळून माघारी येताच सांगितली आपबीती
नागपूर : परदेशात आकर्षक पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील कंपनीने बी. कॉम. शिक्षित विवाहितेकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोर्तुगालमध्ये पोहोचल्यानंतर तिचा पासपोर्ट काढून घेत तिला दोन दिवस खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर पासपोर्ट परत करण्यासाठी पैसे उकळून तिला एका गावातील बिअर शॉपमध्ये साफसफाईचे काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. अखेर प्रसंगावधान राखून महिलेने तेथून पळून करत भारत गाठला. भारतात परतल्यानंतरही आरोपींनी तीन लाख रुपयांची मागणी करत तिच्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात पुण्यातील कंपनीसह आठ जणांविरुद्ध फसवणूक, मानवी शोषण, गुन्हेगारी कट आणि धमकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये पीडित महिलेला इन्स्टाग्रामवर ‘वुई मायग्रेट’ या कंपनीची जाहिरात दिसली. पोर्तुगाल, स्पेन आणि नेदरलँड्स येथे सुपरमार्केट तसेच चॉकलेट कंपनीमध्ये नोकरीची संधी असल्याचे जाहिरातीत सांगण्यात आले होते. दरमहा सुमारे दीड लाख रुपये पगार आणि आकर्षक सुविधांचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे नागपूरमधील महिलेने संबंधित कंपनीशी संपर्क साधला. नोकरी मिळवून देण्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली तिला पुण्यातील कार्यालयात वारंवार बोलावण्यात आले. व्हिसा, वर्क परमिट, विमान तिकीट, विमा आणि अन्य प्रक्रियांसाठी तिच्याकडून टप्प्याटप्प्याने सुमारे आठ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. पैसे भरल्यानंतर मे २०२६ मध्ये ती स्पेनमार्गे पोर्तुगालला पोहोचली. मात्र, परदेशात पोहोचताच तिला धक्कादायक परिस्थितीला सामोरे जावे लागले. तेथे तिचा पासपोर्ट काढून घेण्यात आला आणि दोन दिवस एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. पासपोर्ट परत देण्यासाठी ४०० युरोची मागणी करण्यात आली. भीतीपोटी महिलेने ही रक्कम दिल्यानंतर तिला पासपोर्ट मिळाला. मात्र, अपेक्षित नोकरी देण्याऐवजी तिला एका गावातील बिअर शॉपमध्ये साफसफाईचे काम करण्यास भाग पाडण्यात आले.
याचदरम्यान तेथे काम करणाऱ्या दोन भारतीय महिलांनी तिच्याशी संपर्क साधला. तिच्यावर पुढे शारीरिक शोषणासाठी दबाव आणला जाऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आपण मोठ्या फसवणुकीला बळी पडल्याचे तिच्या लक्षात आले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच महिलेने २९ जून रोजी पहाटे संधी साधून तेथून पलायन केले.
भारतामध्ये परतल्यानंतरही आरोपींकडून तिच्याकडे आणखी तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणात प्रतिमा भाटी, अमितकुमार झा, अझहर शेख, कपिल मिश्रा आणि पोर्तुगालमधील चार जण अशा एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुण्यातील विमानतळ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा