Stock Market Crash Prediction: देश-विदेशातील शेअर बाजार आताकुठे तेजीच्या रुळावर कमबॅक करत आहेत की इतक्यात पुन्हा एकदा इक्विटी मार्केटमध्ये घसरणीचा इशारा देण्यात आला आहे. “शेअर बाजारात मोठी घसरण होणार आहे,” असे 2008 मंदीचे भाकीत करणारे प्रख्यात फंड मॅनेजर मायकल बरी म्हणतात.अमेरिकन बाजाराने उच्चांक गाठला असून इथून पुढे मोठी घसरण होणार आहे.

मायकल बरी यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. देश-विदेशातील शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये बरी प्रख्यात आहेत. याच व्यक्तीने 2008 मध्ये आर्थिक संकटाचे अचूक भाकीत करून बाजारातील गुंतवणूकदारांना वेळीच सावधगिरीचा इशारा दिला होता. त्या वेळी अमेरिकेतील गृहनिर्माण बाजारपेठ कोसळली, ज्याचा परिणाम अमेरिकेसह जगभरातील बाजारांवर झाला.
दादागिरी करता-करता अमेरिका बनला भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार! आखाती देशांनाही मागे टाकले
मायकल बरी यांचा मार्केट क्रॅशचा इशारा
एवढेच नाही तर, अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही झाला होता आणि आता त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या क्रॅशचा इशारा दिला आहे. बरी म्हणतात की ही घसरण 1987 च्या ‘ब्लॅक मंडे’सारखी असेल, ज्यात गुंतवणूकदारांची संपत्ती बेचिराख झालेली.
मायकल बरी म्हणतात की, अमेरिकेन शेअर बाजारांमध्ये सध्या जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे, ज्याचा शेवट मोठ्या घसरणीचा होऊ शकतो. 1987 च्या शेअर बाजारातील घसरणीसारख्या क्रॅशचा अंदाज व्यक्त केला तर, याआधी सबप्राइम मॉर्गेज क्रॅशचा अंदाज वर्तवला होता जो ‘’द बिग शॉर्ट’ या चित्रपटातही दाखवला गेलेला.
अमेरिकी शेअर बाजारात विक्रमी तेजी
अमेरिकन शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, विशेषतः एस अँड पी500 आणि नॅसडॅक, नवीन विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत असताना सबट्रॅक पोस्टद्वारे बाजारात मोठ्या घसरणीचा बरी यांनी अंदाज वर्तवला. शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी, अमेरिकन शेअर बाजार तेजीसह बंद झाला. यापैकी एस अँड पी500 निर्देशांकाने विक्रमी उसळी घेतली. डाऊ जोन्स 0.28%, एस अँड पी500 निर्देशांक 0.62% आणि नॅस्डॅक 1.30 टक्के वाढीसह बंद झाला.
शेअर बाजारातील तेजीच्या काळात बरी म्हणाले की प्रमुख निर्देशांक उच्चांकाजवळ पोहोचत आहेत. “माझं अजूनही असं मानणं आहे की बाजार नवीन उच्चांकाजवळ पोहोचण्याची शक्यता आहे, आणि लक्षणीय घसरण होण्यापूर्वी एस अँड पी500 झेप घेत राहील, ज्यामुळे बाजार अचानक आपली दिशा बदलण्यापूर्वी शेअर्समध्ये आणखी गुंतवणूक होईल.”
Gold Silver Price Hike: सराफा बाजारात दरवाढीचा धडाका; सोन्याचा भाव 1.50 लाखांच्या पार, तर चांदीतही मोठी वाढ! सणासुदीत खरेदीदारांच्या खिशाला कात्रीतसेच AI स्टॉक्समुळे अमेरिकन बाजारात आलेल्या तेजीला बरी सकारात्मक मानत नाही आणि एआय पायाभूत सुविधांची मागणी अशा वित्तपुरवठा व्यवस्थेद्वारे समर्थित आहे, जी कदाचित शाश्वत नाही. मात्र, अशा अनेक कंपन्या आणि ईटीएफमध्ये शॉर्ट पोझिशन्स घेतल्या आहेत आणि परिस्थिती बदलताच ते आपल्या पोझिशन्स बंद करतील असं त्यांनी म्हटले.
1987 मध्ये अमेरिकन शेअर बाजारात काय घडलेलं?
19 ऑक्टोबर, 1987 दिवस शेअर बाजारासाठी ऐतिहासिक दिवस होता. या दिवशी, डाऊ जोन्स 22% कोसळला आणि वाढलेल्या कर्जामुळे 1987 च्या बाजारातील घसरणीसारखी मोठी घसरण होण्याची भीती वाढली आहे. शेअर बाजारात हा दिवस ‘ब्लॅक मंडे’ म्हणून ओळखला जातो. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या मूल्यात एकाच दिवसात 500 अब्ज डॉलर्सची घट झालेली.

