Headlines

Shabana Azmi : ‘धर्माच्या आधारावर फूट पाडणं हे भारताच्या संस्कृतीच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे’, शबाना आझमींचं वक्तव्य


Shabana Azmi : शबाना आझमी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत हिंदू-मुस्लीम विभाजनावर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Shabana Azmi On Hindu Muslim Conflict
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी हिंदू-मुस्लिम विभाजनाच्या मुद्द्यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. समाजातील संघर्ष हा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये नसून उदारमतवादी आणि कट्टरपंथीयांमध्ये आहे, असं त्यांनी म्हटलंय. एका मुलाखतीदरम्यान शबाना आझमी यांनी सांगितलं की, त्या आणि त्यांचे पती जावेद अख्तर, दोन्ही समुदायांमधील कट्टरपंथीयांच्या टीकेला सामोरे गेले आहेत. त्यांच्या मते, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूंचे कट्टरपंथीय त्यांच्या विचारांना स्वीकारू शकत नाहीत.

समाजात जाणीवपूर्वक फुट पाडली जाते

शबाना आझमी म्हणाल्या की, ‘दोन्ही समाजातील कट्टर लोक मला आणि जावेद दोघांनाही सहन करू शकत नाहीत. कट्टर हिंदू कट्टर आणि कट्टर मुस्लीम लोकांना आम्ही आवडत नाही. यावरूनच आमची धर्मनिरपेक्षता सिद्ध होते, असं आम्हाला वाटतं. कारण कधी एखादा मौलवी आमच्याविरोधात फतवा काढतो, तर कधी कोणी आम्हाला दहशतवादी म्हणतं. आपल्याला या हिंदू-मुस्लीम वादाच्या पलीकडे जावं लागेल. समाजात फूट पाडण्यासाठी जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, त्यामध्ये आपण न पडणं हाच यावरील एकमेव उपाय आहे. ही लढाई हिंदू आणि मुस्लीम यांच्यात नसून उदारमतवादी आणि कट्टर लोकांमध्ये आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे.’

Maharashtra TimesVandana Gupte : ‘नाटकाच्या प्रयोगात फोन वाजला की अभिनेते थांबतात, मला त्यांचा राग येतो’; स्पष्टच बोलल्या अभिनेत्री वंदना गुप्ते
‘उदारमतवादी हिंदू आणि मुस्लीम एका बाजूला आहेत, तर कट्टर हिंदू आणि मुस्लीम दुसऱ्या बाजूला आहेत. तुम्ही जेव्हा याकडे या दृष्टिकोनातून बघाल, तेव्हाच धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचं विष तुमच्या मनातून निघून जाईल. धर्माच्या आधारावर फूट पाडणं हे भारताच्या संस्कृतीच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे. खरा भारत म्हणजे सांस्कृतिक विविधता आहे. आम्ही आयुष्यभर हीच संस्कृती जपली आहे. माझ्या कुटुंबानं नेहमीच भारताच्या विविधतेचा आदर केला आहे.’ असं शबाना आझमी यांनी शेवटी सांगितलं. ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी बोलत होत्या.

Vandana Gupte Interview : हाताने रिक्षा उलटवली, मराठी मोहीम योग्यच, वंदना गुप्ते यांची बेधडक मुलाखत

दरम्यान, याच मुलाखतीत शबाना आझमी यांनी ‘बटवारा १९४७’ या सिनेमाबद्दलही प्रतिक्रिया दिली. सनी देओलला प्रेक्षक मुस्लीम पात्राच्या भूमिकेत स्वीकारू शकले नाहीत, असं शबाना यांनी म्हटलं आहे.