Headlines

Satara Koyna Dam 75 Thousand Cusecs Water Per Second Schools Closed Road to Lingamala Waterfall Closed; साताऱ्यात पावसाचं थैमान; कोयना धरणाची पाण्याची आवक झपाट्याने वाढली, अतिवृष्टीचा इशारा, लिंगमळा धबधबा मार्ग बंद


Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून मागील 24 तासांत कोयना धरणात प्रतिसेकंद 75 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

Koyna Dam Water Storage Latest Update
सातारा कोयना धरण पाण्याची वाढ(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : पश्चिम घाटात सध्या पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत महाबळेश्वर, नवजा आणि कोयनानगर याठिकाणी तब्बल 975 मिलीमीटर पाऊस झाला आहे. एकट्या महाबळेश्वरात 473 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धुव्वाधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 75 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. 24 तासांत धरणातील पाणीसाठ्यात पावणे सात टीएमसीने (6.76 टीएमसी) वाढ झाली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाच तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

लिंगमळा धबधब्याकडे जाणारा मार्ग बंद

कोयना धरणात रविवारी सायंकाळी 5 वाजता 17.80 टीएमसी (उपयुक्त) पाणीसाठा होता. आज सोमवारी सकाळपर्यंत त्यात प्रचंड वेगाने वाढ झाली आहे. आज सकाळी 8 वाजता पाणीसाठा 22.54 टीएमसी झाला आहे. गेल्या 24 तासांतील पावसाची आकडेवारी पाहता कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तुफान पर्जन्यवृष्टी झाली आहे. महाबळेश्वरमध्ये 473 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाला आहे. कोयनानगर येथे 257 तर नवजा येथे 244 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे महाबळेश्वरातील लिंगमळा धबधब्याकडे जाणारा मार्ग बंद झाला असून पर्यटकांना तिकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
Maharashtra TimesMumbai Pune Railway : दरडीचा दुहेरी फटका; मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील सहा अतिगर्दीच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द, प्रवाशांचा पर्यायी व्यवस्थेचा शोध, जाणून घ्या अपडेट्स

अतिवृष्टी होण्याचा इशारा

सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आज अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई आणि सातारा या पाच तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Maharashtra TimesPatan Village Landslide : मावळमध्ये घरावर दरड कोसळली, तिघांच्या मृत्यूची भीती; लोणावळ्यात विक्रमी 625 मिमी पाऊस, दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी

महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव तुडुंब

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर धरण पाणलोट क्षेत्रात सर्वत्र अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणात प्रतिसेकंद 78,322 क्युसेक इतकी पाण्याची आवक सुरू आहे. आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील मोरणा, महिंद, सातारा तालुक्यातील ठोसेघर, महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे. कोयना, कृष्णा या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील प्रचंड वाढ झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा