Sarika Navathe Got Teased For Language On Avantika Set ; Sarika Navathe : अवंतिकाच्या सेटवर गावरान भाषेमुळे हसायचे लोक, सारिका नवाथेने ट्रिक शोधून केलेली बोलती बंद
Sarika Navathe Got Teased For Language On Avantika Set ; Sarika Navathe : अवंतिकाच्या सेटवर गावरान भाषेमुळे हसायचे लोक, सारिका नवाथेने ट्रिक शोधून केलेली बोलती बंद
मराठी कलाकार हे वेगवेगळ्या शहरांतून,गावातून काम करण्यासाठी मुंबईसारख्या शहरात येतात. त्यांना इथे आल्यानंतर बरेचदा भाषेशी मिळते जुळते करण्यास थोडा वेळ जावा लागतो. प्रत्येक प्रांतानुसार भाषा बदलते असे म्हणतात त्यामुळे तिची बोलण्याची पद्धत ही वेगळी असते. मुंबईतील बोलण्याची पद्धत अगदीच वेगळे असल्यामुळे बरेचदा कलाकारांमध्ये भाषेचा न्यूनगंड तयार होतो. कमळी या मालिकेत काम करणारी अभिनेत्री सारिका नवाथे हिला आलेला एक अनुभव मुलाखतीमध्ये शेअर केला.
सारिका नवाथेने सांगितले की, नागपूर मध्ये साबुदाण्याची खिचडी असे बोलत नाही त्या ऐवजी त्या पदार्थाला साबुदाण्याची उसळ असं म्हटलं जातं. जेव्हा मी अवंतिका या मालिकेचा शूटिंग करायला गेले तेव्हा पहिल्यांदा एका प्रोफेशनल शूटिंगच्या सेटवर पाऊल ठेवलेलं. तिथे पाऊल ठेवल्यावर मला सगळ्यात पहिल्यांदा जाणवलं ते म्हणजे आपण या सगळ्यांपेक्षा वेगळे दिसतो. पण ते वेगळेपणच आपल्यातला एक यूएसपी असतो हे मला ठाऊक नव्हतं.
Tharala Tar Mag : एकीचं तुरुंगात तर एकीचं घरात, थाटात पार पडलं प्रिया-सायलीचं डोहाळे जेवण, पेढा की बर्फी कोणी काय निवडलं? आश्रमातल्या मुली किडनॅप मला वाटायचं की या सगळ्या मुली छान गोऱ्या आहेत, त्यांचे केस छोटे आहेत, सगळ्या शिडशिडीत आहेत मग मी तशी का नाही? तेव्हा माझी लांब सडक वेणी होती, मी गोरी नव्हते सावळी होते. मी शिडशिडीत नव्हते. माझं बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग होतं सगळ्याच बाबतीत… पण मला या गोष्टी कोणाला सांगता यायच्या नाहीत. आपल्यावर आधीपासूनच संस्कार झालेले असतात की आपल्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला श्रेष्ठत्व द्यायचं. मात्र काळानुसार माझ्या लक्षात आलं की सगळेच ठिकाणी असं काही नसतं.
पण पुढे पुढे माझ्या लक्षात आलं की प्रत्येक भाषा ही आपल्या आईसारखी आहे. कुठल्या कुठल्या आई या गावंढळ असतात पण तरीही ते आई असतात, काही आई या कॉर्पोरेट असतात पण तरीही त्या आई असतात. जसे मराठी भाषेत अनेक लेखक आहेत तसेच इंग्रजी भाषेतही अनेक उत्तम लेखक आहेत. माझा अभ्यास इंग्रजी भाषेत झाल्यामुळे मला त्याचाही फायदा झाला. जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे लोक आपल्याला आपण मराठी बोलत असताना हसतात पण जर आपण इंग्रजी बोललो तर ते शांत राहतात तेव्हा मात्र मी त्याचा फायदा करून घेतला. माझं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं मी त्यांच्या समोर इंग्रजी भाषेत बोलू लागल्यावर ते शांत राहायचे.
सारिका नवाथेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अवंतिका, ठिपक्यांची रांगोळी, मोलकरीण बाई, कुंकू, टिकली आणि टॅटू, संत गोरा कुंभार अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. तसेच बऱ्याच सिनेमांमध्येही ती दिसली.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा