मुख्यमंत्र्यांच्या गाडीत किंवा विमानात बसण्याची इच्छा आज प्रत्येकाचीच असते. ‘देवाभाऊंचा’ संवाद लाभणे म्हणजे एक प्रकारे आपले भविष्य घडवण्यासारखे आहे. विमानातील या प्रवासानंतर निश्चितच जयंत पाटलांच्या मनात योग्य आणि सकारात्मक विचार येतील, असे मंत्री नी
.
नीतेश राणे म्हणाले की, अंबादास दानवे हे मूळचे स्वयंसेवकच होते आणि ते संघाच्या शाखेतही जायचे, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विरोधी भूमिका घेतल्याने दानवे यांना किती वेदना व्हायच्या, हे त्यांनी मला वैयक्तिकरीत्या सांगितले. दानवे जर पुन्हा हिंदुत्व आणि संघाच्या विचारांकडे येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. अंबादास दानवे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याच्या मुद्द्यावर राणेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
खासदारांनी पंतप्रधानांना भेटण्यात काही गैर नाही
नीतेश राणे म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना भेटणे किंवा मतदारसंघातील कामे घेऊन जाणे यात काही चूक नाही. आदित्य ठाकरेसुद्धा विधानसभेच्या काळात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कामे घेऊन यायचे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधानांना भेटण्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.
जरांगे पाटलांनी जपून बोलावे
नीतेश राणे म्हणाले की, शासकीय प्रक्रियेतील अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे मराठा मुलांचे नुकसान होत असेल, तर जरांगेंच्या आधी मीच अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करेन. मनोज जरांगे समाजाच्या हितासाठी लढत असले तरी भाजपच्या प्रमुख नेत्यांविरोधात त्यांनी वापरलेली भाषा चुकीची आहे. जरांगेंनी वक्तव्य करताना भाषेचे भान ठेवावे; मराठा समाजाच्या न्यायासाठी मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे.
हे ही वृत्त वाचा जयंत पाटील-देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास:हर्षवर्धन सपकाळ यांची खोचक टीका, कॉंग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया काय?

राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. ठाकरेंच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर, उद्या 10 ऑगस्ट रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ही भेट विविध प्रश्नांसंदर्भात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले असले तरी, दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई ते कोल्हापूर असा एकाच विमानाने प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वाचा सविस्तर
