Headlines

Sarika Navathe Got Teased For Language On Avantika Set ; Sarika Navathe : अवंतिकाच्या सेटवर गावरान भाषेमुळे हसायचे लोक, सारिका नवाथेने ट्रिक शोधून केलेली बोलती बंद


मराठी कलाकार हे वेगवेगळ्या शहरांतून,गावातून काम करण्यासाठी मुंबईसारख्या शहरात येतात. त्यांना इथे आल्यानंतर बरेचदा भाषेशी मिळते जुळते करण्यास थोडा वेळ जावा लागतो. प्रत्येक प्रांतानुसार भाषा बदलते असे म्हणतात त्यामुळे तिची बोलण्याची पद्धत ही वेगळी असते. मुंबईतील बोलण्याची पद्धत अगदीच वेगळे असल्यामुळे बरेचदा कलाकारांमध्ये भाषेचा न्यूनगंड तयार होतो. कमळी या मालिकेत काम करणारी अभिनेत्री सारिका नवाथे हिला आलेला एक अनुभव मुलाखतीमध्ये शेअर केला.

सारिका नवाथेने सांगितले की, नागपूर मध्ये साबुदाण्याची खिचडी असे बोलत नाही त्या ऐवजी त्या पदार्थाला साबुदाण्याची उसळ असं म्हटलं जातं. जेव्हा मी अवंतिका या मालिकेचा शूटिंग करायला गेले तेव्हा पहिल्यांदा एका प्रोफेशनल शूटिंगच्या सेटवर पाऊल ठेवलेलं. तिथे पाऊल ठेवल्यावर मला सगळ्यात पहिल्यांदा जाणवलं ते म्हणजे आपण या सगळ्यांपेक्षा वेगळे दिसतो. पण ते वेगळेपणच आपल्यातला एक यूएसपी असतो हे मला ठाऊक नव्हतं.

Maharashtra TimesTharala Tar Mag : एकीचं तुरुंगात तर एकीचं घरात, थाटात पार पडलं प्रिया-सायलीचं डोहाळे जेवण, पेढा की बर्फी कोणी काय निवडलं? आश्रमातल्या मुली किडनॅप
मला वाटायचं की या सगळ्या मुली छान गोऱ्या आहेत, त्यांचे केस छोटे आहेत, सगळ्या शिडशिडीत आहेत मग मी तशी का नाही? तेव्हा माझी लांब सडक वेणी होती, मी गोरी नव्हते सावळी होते. मी शिडशिडीत नव्हते. माझं बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग होतं सगळ्याच बाबतीत… पण मला या गोष्टी कोणाला सांगता यायच्या नाहीत. आपल्यावर आधीपासूनच संस्कार झालेले असतात की आपल्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला श्रेष्ठत्व द्यायचं. मात्र काळानुसार माझ्या लक्षात आलं की सगळेच ठिकाणी असं काही नसतं.

Maharashtra TimesSambhavna Seth : संभावना सेठने पोलीस स्टेशनमध्ये काढली रात्र, मोलकरणीच्या बहिणीला तिच्या मालकाने ठेवलेलं कैदेत, ओळख पत्र हिसकावून कपडेही लपवले!
जेव्हा मी सेटवर बोलायला लागायचे तेव्हा मला सगळे हसायचे कारण माझी भाषा नागपुरी होती. आता ही भाषा ट्रेंड झाली आहे. भारत गणेश पुरे सारख्या लोकांनी त्या भाषेला एक मान मिळवून दिला. ते मला करता आलं नाही त्यामुळे माझ्यावरती लोक हसायचे. या प्रकाराबद्दल काय करायचं हा विचार करण्याऐवजी मी शांत राहू लागले. आपण बोललोच नाही तर आपल्याला कोणी हसणार नाही असा विचार करू लागले.


पण पुढे पुढे माझ्या लक्षात आलं की प्रत्येक भाषा ही आपल्या आईसारखी आहे. कुठल्या कुठल्या आई या गावंढळ असतात पण तरीही ते आई असतात, काही आई या कॉर्पोरेट असतात पण तरीही त्या आई असतात. जसे मराठी भाषेत अनेक लेखक आहेत तसेच इंग्रजी भाषेतही अनेक उत्तम लेखक आहेत. माझा अभ्यास इंग्रजी भाषेत झाल्यामुळे मला त्याचाही फायदा झाला. जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे लोक आपल्याला आपण मराठी बोलत असताना हसतात पण जर आपण इंग्रजी बोललो तर ते शांत राहतात तेव्हा मात्र मी त्याचा फायदा करून घेतला. माझं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं मी त्यांच्या समोर इंग्रजी भाषेत बोलू लागल्यावर ते शांत राहायचे.

सारिका नवाथेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अवंतिका, ठिपक्यांची रांगोळी, मोलकरीण बाई, कुंकू, टिकली आणि टॅटू, संत गोरा कुंभार अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. तसेच बऱ्याच सिनेमांमध्येही ती दिसली.