Sangli Satara Vidhan Parishad : सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवेळी झालेल्या प्रकारामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार दगाफटका करण्याची भीती होती. नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचा भाजपने करेक्ट कार्यक्रम केला, तर सांगली-सातारा मतदार संघातील अडचणीत असलेल्या आपल्या उमेदवाराला मात्र भाजपने त्याच शिवसेनेच्या मतांवर निवडून आणले.

नाशकात भाजप-राष्ट्रवादीची मतं फुटली
नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील भाजपकडे १८८, शिवसेनेकडे १७१ तर राष्ट्रवादीकडे १०७, असे ४६६ संख्याबळ असतानाही शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना केवळ २४८ मते पडली. या उलट भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना तब्बल ३५७ मते मिळाली. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीची मते फुटल्याचे स्पष्ट झाले. त्यातही भाजपची सर्वाधिक मते फुटल्याचे बोलले जात आहे. त्यातही आम्ही गोकुळ गितेंना मदत करून निवडून आणल्याचा दावा शिवसेना उबाठाने केला आहे. नाशिकमधील या निकालानंतर महायुतीत खळबळ उडाली आहे.
Maharashtra Politics : चौथा ‘संजय’ही धक्का देणार? ठाकरेंच्या तातडीच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चा; आता चौघांच्या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण
भाजपला दगाफटक्याची भीती
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांच्या समोर आव्हान होते. सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवेळी झालेल्या राड्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार दगाफटका करण्याची भीती होती. शिवसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी शेवटपर्यंत ताठर भूमिका घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
जळगावात युतीधर्म, पण नाशिकमध्ये बंडखोरी; शिवसेना नेत्याची भाजपविरोधात खदखद
भाजप नेत्यांना धोक्याची चाहूल लागताच भाजपकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न झाला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांची एकत्रित बैठक झाल्यानंतर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी मतदारांना महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम पहिल्या पसंतीची मते मिळवून विजयी होऊ शकले. मात्र, नाशिकमध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाले. त्याठिकाणी भाजपचे बंडखोर गोकुळ गिते विजयी झाले. शिवसेना उबाठा गटाची गितेंना मदत झालीच, पण भाजपच्या मतदारांनीही गितेंनाच साथ दिल्याचे उघड झाले आहे.
Omraje Nimbalkar : माझी खरी निष्ठा कोणत्याही पद-पक्षाशी नाही, शिवसेना प्रवेशानंतर रात्री 10.49 वाजता ओमराजेंची मोठी घोषणा
गोरेंचा देसाईंना अप्रत्यक्ष टोला
विधान परिषद निवडणुकीत महायुतीची मते फुटल्याबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांनी खोचक प्रतिक्रिया देत नाव न घेता शिवसेना नेते, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यावर निशाणा साधला. धैर्यशील कदम यांना किती मते पडायला पाहिजे होती, कोणी मते दिली नाहीत, काय घडले, याचा आम्ही नक्कीच हिशोब करू. हिशोब करण्यात आम्ही पक्के आहोत. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी काय केले ते देवाला माहिती, असा टोला जयकुमार गोरे यांनी नाव न घेता लगावला. अनेकांची गणिते वेगवेगळी होती. अनेकांच्या मनात एक, ओठात एक आणि करणीत वेगळे होते, अशा शब्दांत गोरे यांनी मत फुटीचा अप्रत्यक्षपणे ठपका शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर ठेवला.

