Sachin Deshpande Exclusive : मालिका आणि सिनेमांमध्ये सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सना कास्ट केलं जातं. त्यावर अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन देशपांडेनं भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – आजकाल सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून मालिका आणि सिनेमांमध्ये रील्स स्टार्सना कास्ट केलं जातं. त्यावर अनेक कलाकारांनी खंत व्यक्त केली आहे. अशातच आता मराठी अभिनेता सचिन देशपांडेनंही ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं असून संताप व्यक्त केला आहे.
सचिन देशपांडे म्हणाला की, ‘मी काही प्रोजेक्ट्स केले. पण, मधला काळ असा होता, जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं. मी खूप ऑडिशन दिल्या. अनेकांना मेसेज केले. पण, नंतर लक्षात आलं, त्यांच्याही हातात काही नाहीये. फॉलोअर्स बघून काम देणं, हा ट्रेंड फार दिवस नाही राहणार. इन्स्टाग्राम सोडून दुसरं काहीतरी येईल. पण, ज्यांना त्यातलं गणित नाही जमत, त्यांनी काय करायचं? लाईक्स, कमेंट्सचं खूप प्रेशर असतं. वेळेत पोस्ट नाही केलं, तर फॉलोअर्स कमी होतात.’ Meena Kumari : 15 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न, दारूचं व्यसन, वयाच्या 39 व्या वर्षी मृत्यू; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची हृदयद्रावक कथा ‘ज्याला लीड रोल मिळालाय, त्याचे आपणहून फॉलोअर्स वाढतात. त्यामुळे त्याला दुसरा प्रोजेक्ट मिळतो. फॉलोअर्स असल्यामुळे त्यालाच मुख्य भूमिका मिळते. नाहीतर मग नवीन मुलाला किंवा मुलीला मुख्य भूमिका मिळते. मधल्या फळीतले कलाकार वरच्या लेव्हलला जाऊन पोहोचलेत, असे खूप कमी आहेत. त्यांच्याकडे भाऊ, मित्र, पाहुणा कलाकार म्हणून बघितलं जातं. दोन महिन्यात एका वाहिनीनं तिच जोडी पुन्हा रिपीट केली आहे.’
सचिन देशपांडेचं वक्तव्य
‘काहीतरी आक्षेपार्ह कंटेंट टाकला की, फॉलोअर्स वाटतात. त्यानंतर जाहिराती मिळतात, मग मुख्य भूमिकांसाठी विचारणा होते. हे फेम जास्त दिवस नाही राहत. तुमचे फॉलोअर्स तुमचं अभिनयकौशल्य ठरवत नाहीत. तुमचं अभिनयकौशल्य आणि तुमचा अनुभवच तुमच्या अभिनयाला योग्य न्याय मिळवून देऊ शकतो. आधी केलेलं काम आणि ऑडिशन याआधारेच सगळं ठरवावं, असं मला वाटतं.’ असं सचिननं शेवटी सांगितलं. Kangana Ranaut : ‘तरुणांची दिशाभूल करू नका, त्यासाठी मला लाखो रुपये मिळालेले’ जुन्या सिनेमातील व्हायरल व्हिडिओवर कंगना रणौतचा संताप दरम्यान, सचिन देशपांडेच्या कामाबद्दल बोलायचं तर त्यानं ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘काहे दिया परदेस’, ज्ञानेश्वर माऊली’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा