Headlines

Sachin Ahir says Sushma Andhare wont leave Shiv Sena UBT Uddhav Thackeray should do justice; सुषमा अंधारे चळवळीतील कार्यकर्त्या, पक्ष सोडणार नाहीत, पण उद्धव ठाकरे यांनी योग्य न्याय द्यावा, सचिन अहिर यांची अपेक्षा


Sachin Ahir on Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्याबाबतची भूमिका ही वैयक्तिक असून त्यांनी पक्षासाठी शेकडो सभा घेतल्या आहेत. त्या चळवळीतील कार्यकर्त्या असल्याने पक्ष सोडणार नाहीत, मात्र पक्षाने त्यांना योग्य न्याय द्यावा, अशी अपेक्षाही सचिन अहिर यांनी व्यक्त केली.

Sushma Andhare Sachin Ahir Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मित्रपक्षाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने पुण्यात शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही, अशी खंत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. पुण्यात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी मी अधिक वेळ देणार आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात संधी दिली जाईल. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढलेली दिसेल, असा दावाही त्यांनी केला.

पक्षसंघटनेसाठी सतत कार्यरत राहीन

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर अहिर सोमवारी प्रथमच पुण्यात आले. पुणे श्रमिक पत्रकार संघात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, अजय भोसले, शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे आदी उपस्थित होते. ‘विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची जबाबदारी असली, तरी मी राजकीय मर्यादांचे पालन करून पक्षसंघटनेसाठी सतत कार्यरत राहीन. विविध समाज घटकांतील आणि वंचित घटकांतील कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न करीन,’ असे अहिर म्हणाले.
Maharashtra TimesDisha Salian : आदित्य ठाकरेंवर FIR नोंदवून CBI तपास व्हावा, दिशा सालियानच्या वडिलांची विनंती, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना खडसावलं

इच्छुक स्वतःहून शिवसेनेत आल्यास स्वागतच

‘मी स्वतःहून कुणाला पक्षात आणण्याचा प्रयत्न करणार नाही. मात्र, इच्छुक स्वतःहून आले तर त्यांचे स्वागत असेल. सुषमा अंधारे यांच्याबाबतची भूमिका ही वैयक्तिक आहे. त्यांनी पक्षासाठी शेकडो सभा घेतल्या असून, त्या चळवळीतील कार्यकर्त्या असल्याने पक्ष सोडणार नाहीत. पक्षाने त्यांना योग्य न्याय द्यावा,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Maharashtra Farmer Loan Waiver| Tax भरणारे 94 हजार शेतकरी अपात्र, कर्जमाफीचे पैसे उद्या जमा होणार?

अहिर यांची सदिच्छा भेट

महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सोमवारी शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील ‘सिल्व्हर रॉक्स’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
Maharashtra TimesNashik Crime : हॅलो कंट्रोल रुम, इथे बॉडी पडलेय… पोलीस पोहोचताच वेगळंच चित्र, दोन महिन्यात दोन फेक कॉल, पण तीच बीटमार्शल असल्याने संशय

ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत

सचिन अहिर यांनी गेल्याच महिन्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत बिनविरोध बाजी मारली. सध्या त्यांच्यावर पुणे आणि मुंबई परिसरात शिवसेना पक्षाची संघटनात्मक वाढ आणि पक्ष बळकटीकरणाची मुख्य जबाबदारी आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा