Headlines

Sachin Ahir demanded Ministry Berth or Vidhan Parishad Deputy Speaker Post Shiv Sena UBT Leaders meet Eknath Shinde; उपसभापती करा किंवा मंत्रिपद द्या, सचिन अहिर यांनी दिलेले दोन पर्याय; ठाकरेंच्या तीन शिलेदारांची शिंदेंशी गुप्त चर्चा


Maharashtra Politics : ठाकरेसेनेची ताकद मोडून काढण्यासाठी शिंदे गटाने चालवलेल्या आक्रमक ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेअंतर्गत सचिन अहिर यांचा प्रवेश ही एक महत्त्वाची आणि निर्णायक खेळी होती

Sachin Ahir Uddhav Thackeray Eknath Shinde Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत केलेला नाट्यमय प्रवेश हा वरकरणी अचानक वाटत असला, तरी या हालचाली अनेक महिन्यांपासून सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. किंबहुना, ठाकरेसेनेची ताकद मोडून काढण्यासाठी शिंदे गटाने चालवलेल्या आक्रमक ‘ ऑपरेशन टायगर ‘ मोहिमेतील ही एक महत्त्वाची आणि निर्णायक खेळी होती.

शिंदेंचे राजकीय रणनीतीकार अहिर

केवळ एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यापुरते हे स्थलांतर मर्यादित नसून, सचिन अहिर यांच्या प्रवेशाकडे शिंदेंचा राजकीय रणनीतीकार म्हणून पाहिले जात आहे. कारण अहिर केवळ स्वतःच्या प्रवेशाबाबतच वाटाघाटी करत नव्हते, तर त्यांनी याआधीच ठाकरेंच्या गोटात मोठी फूट पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अहिरांकडून दोन पर्याय

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन अहिर हे गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. पावसाळी अधिवेशनापूर्वी या चर्चांना अधिक वेग आला; त्यावेळी ठाकरे गटाच्या तीन नेत्यांनी शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याचे समजते. या नेत्यांमध्ये अहिर यांचाही समावेश होता. त्या सुरुवातीच्या भेटीतच अहिर यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली होती – महायुती सरकारमध्ये मंत्रिपद किंवा विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची संधी, यापैकी एकाची त्यांनी मागणी केली होती.
Maharashtra TimesVihan Shrivastav Mother : माझा विहान येईल आणि क्रिकेट खेळायला जाईल! स्कूलबस अपघातात लेकाचा मृत्यू, आई हातात बॅट घेऊन शून्यात हरवलेली

तीन दिवस आधी शिक्कामोर्तब

शुक्रवार २६ जून रोजी मुंबईत सचिन अहिर यांनी शिंदे यांच्याशी बंद दाराआड खाजगी भेट घेतली आणि त्यात त्यांनी आपली मागणी पुन्हा एकदा मांडल्याचे समजते. या प्रकरणातील महत्त्वाचा टप्पा शनिवार २७ जून गाठला गेला, जेव्हा शिंदे यांनी अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे. म्हणजेच, जेव्हा शुक्रवारी उद्धव ठाकरे हे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे करण्यासाठी मुंबईहून निघाले होते, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाला सुरुंग लावणारी अंतिम बैठक झाली.

उद्धव ठाकरेंनी वृद्धाश्रमात जावं, आदित्यंना अवघड दिवस; सचिन अहिरांवरून नितेश राणेंचा हल्लाबोल

उपसभापतीपदाच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, अहिर यांनी पुन्हा एकदा शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहत, सचिन अहिर यांनी महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Maharashtra TimesSachin Ahir : ठाकरेसेनेत राहून ‘ऑपरेशन टायगर’ राबवणारे ‘धुरंधर’, अहिरांनी अखेरपर्यंत गाफील ठेवलं, 11.30 वाजता ‘जय महाराष्ट्र’चा मेसेज

संजय पाटलांचे मन वळवण्यात मोठा वाटा

अहिर यांचे हे पक्षांतर राजकीयदृष्ट्या अत्यंत स्फोटक ठरण्याचे कारण म्हणजे, ‘ऑपरेशन टायगर’मध्ये त्यांची पडद्यामागची कथित भूमिका. अहिर यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दिना पाटील यांना मन वळवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पाटील हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून, अलिकडेच शिंदे गटात सामील झालेल्या ठाकरेसेनेतील सहा फुटीर खासदारांपैकी एक आहेत. पाटील आणि अहिर यांच्यात दीर्घकाळापासून वैयक्तिक आणि राजकीय मैत्री आहे. उमेदवारी मिळवण्यात पाटलांना मदत करण्यातही अहिर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा