Headlines

23K Salary 3 Lakh Debt 27 Year Old Confesses How Partying Destroyed His Financial Life | २३ हजारांच्या पगारात घेतलं ३ लाखांचं कर्ज, क्लबिंगच्या नादात झाला कंगाल, आता खायला पैसे नाहीत, तरुणाची पोस्ट व्हायरल


Salary vs Expenses: २३ हजार रुपयांचा पगार असलेल्या एका तरुणानं ऐषआरामासाठी क्रेडिट कार्ड घेतलं. मात्र, त्याचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्यामुळे तो आता पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण कुटुंब त्याच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कर्ज कसं फेडायचं, हा प्रश्न आता त्याला सतावत आहे.

Credit Card Debt
(ai generated image)
“अंथरूण पाहून पाय पसरावे” ही म्हण आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल. म्हणजे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नये. तसं केल्यास काय होऊ शकतं, याचं जिवंत उदाहरण तुम्हाला या व्हायरल पोस्टमध्ये पाहायला मिळेल. एका तरुणाला पार्टी करण्याची प्रचंड हौस होती. लोकांसमोर चमकोगिरी करण्यासाठी तो आपल्या ऐपतीपेक्षा जास्त पैसे खर्च करायचा. त्याचा पगार फक्त २३ हजार रुपये होता. मात्र, पार्टीच्या नादात आता त्याच्या डोक्यावर तब्बल ३ लाख रुपयांचं कर्ज झालं आहे. विशेष म्हणजे, तो कुटुंबातील एकमेव कमावणारा सदस्य आहे. त्यामुळे घर कसं चालवायचं आणि कर्ज कसं फेडायचं, या प्रश्नांनी तो पूर्णपणे चिंतेत पडला आहे.

तरुणासोबत नेमकं घडलं काय?

तरुणासोबत नेमकं घडलं काय?

हे प्रकरण r/CreditCardsIndia या रेडिट पेजवरील khadaaL या अकाउंटवर शेअर करण्यात आलं आहे. ही पोस्ट लिहिणाऱ्या तरुणानं स्वतःच्या चुका मान्य केल्या आहेत. तो सांगतो की, त्याला पार्टी करणं, मित्रांसोबत क्लबिंग, मौजमजा आणि ऐषआरामावर खर्च करणं खूप आवडायचं. मात्र, त्याचा पगार फक्त २३ हजार रुपये होता. त्यामुळे खर्च करण्याची क्षमता वाढावी म्हणून त्यानं बँकेचं क्रेडिट कार्ड घेतलं. आणि मग नेमकं तेच घडलं, ज्याची भीती होती. अनियंत्रित खर्चामुळे त्याच्यावर तब्बल ३,०५,३०० रुपये इतकं कर्ज झालं.

आता पुढे काय करणार?

आता पुढे काय करणार?

वरकरणी ३ लाख रुपयांचं कर्ज फार मोठं वाटत नसले, तरी या तरुणाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. संपूर्ण कुटुंब त्याच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ३ लाख रुपयांचं कर्ज म्हणजे मोठं ओझं ठरलं आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्यानं पुन्हा बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिबिल स्कोअर खराब असल्यामुळे त्याला नवीन कर्ज मिळत नाही. दुसरीकडे दरमहा भरावा लागणारा ईएमआय त्याची आर्थिक स्थिती आणखी बिकट करत आहे. पोस्टच्या शेवटी तो म्हणतो की, चुकीची संगत आणि चुकीचे आर्थिक निर्णय यामुळेच त्याच्यावर ही वेळ आली आहे. असो, या कर्जातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्याला काय सल्ला द्याल?
(फोटो सौजन्य – Aukid phumsirichat/pexels.com)

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा